esakal | घराचे कौलारु काढून वेटर शिरला हॉटेलमालकिनीच्या बेडरुममध्ये अन्‌...(वाचा कुठे)
sakal

बोलून बातमी शोधा

Murder In Karmad Aurangabad

हॉटेल मालकिणीचा गळा चिरून खून करीत तिच्या हातातील सोन्याची अंगठी पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीला जन्मठेप व विविध कलमांअन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.26) ठोठाविली.

घराचे कौलारु काढून वेटर शिरला हॉटेलमालकिनीच्या बेडरुममध्ये अन्‌...(वाचा कुठे)

sakal_logo
By
​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : हॉटेल मालकिणीचा गळा चिरून खून करीत तिच्या हातातील सोन्याची अंगठी पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीला जन्मठेप व विविध कलमांअन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.26) ठोठाविली. विशेष म्हणजे गुन्ह्यातील दुसरा आरोपी बालाजी हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याचा शोध घेण्यास अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. 

हेही वाचा- सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

प्रकरणात करमाड परिसरातील ज्योती हॉटेलातील वाढपी नुपेंद्र गेंदालाल सहारे (वय 31, रा. तेलंगणा, हैदराबाद) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, ज्योती हॉटेलच्या मालकीण ज्योती मनोज नायर (45) या तीन जुलै 2017 ला नेहमीप्रमाणे त्यांनी नुपेंद्र सहारे, हॉटेलवरील स्वयंपाक मदतनीस तथा आरोपी राजू ऊर्फ लहू राठोड व बालाजी यांना जेवण करून झोपी जाण्याचे सांगितले. त्यानुसार नुपेंद्र सहारे हॉटेलातील एका खोलीत झोपी गेले; तर दोघे आरोपी दारू पीत बसले होते. बाहेरहून आल्यानंतर ज्योती नायरदेखील आपल्या बेडरूममध्ये झोपी गेल्या. चार जुलै 2017 च्या पहाटे तीनच्या सुमारास दोघा आरोपींनी स्वयंपाक घरातील चाकू व मिरची पूड घेत ज्योती यांच्या बेडरूमच्या छताचे कौलारू काढून त्यांच्या बेडरूममध्ये शिरले. ज्योती यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने गळा चिरून त्यांचा खून केला; तसेच त्यांच्या हातातील बोटामध्ये असलेली सोन्याची अंगठीदेखील आरोपींनी काढून घेतली. त्यानंतर दोघे आरोपी हॉटेलवरील दुचाकी घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचाच- (व्हिडीओ पाहा) कर्जमाफी केली, पण शेतकरी म्हणतात........ 

तक्रारदाराने केली आत्महत्या 
खटल्याची सुनावणी सुरू असताना फिर्यादी नुपेंद्र सहारे यांनी मे 2019 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, खटल्यात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी 13 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंड संहिताच्या कलम 302 अन्वये जन्मठेप व 500 रुपये दंड, कलम 404 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात देशपांडे यांना ऍड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. 

हे वाचलंत का? -लघुशंकेला ​आडोशाला जाताय? आधी दारुडा दिसतो का बघा...