esakal | महत्त्वाची बातमी : वाचा..! जिच्या चालण्याचे कौतुक तीच्यापासूनच होते काय ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Sheep-Farming-Subsidy..jpg

पावसाळ्यात जिच्या चालण्याची चर्चा सर्वत्र असते. ती दिसली की माणूस तर नक्कीच थबकतो. तीचे निरीक्षण करतो. मात्र ती पावसाळ्यात प्राण्यांचाच कर्दनकाळ ठरते. वाचा ती आहे तरी कोण, आणि करते तरी काय.

महत्त्वाची बातमी : वाचा..! जिच्या चालण्याचे कौतुक तीच्यापासूनच होते काय ? 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाणी साचते आणि खुरटा हिरवा चारा तयार होतो. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यापासून दुरावलेली जनावरे अधाशासारखी त्यावर तुटून पडतात आणि त्यातून त्यांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, राणीखेत, लिव्हर फ्लूकसारखे आजार होतात. विशेष म्हणजे, लिव्हर फ्लूक आजार जिच्या चालण्याकडे कौतुकाने पाहिले जाते त्या शंखी गोगलगायीच्या माध्यामातून होतो. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

पावसाळ्यात जनावरांना विविध आजार होऊन शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या रोगांशिवाय गोचिड, गोमाशी, विविध कृमी व परोपजीवींचा प्रादूर्भाव होतो. चिखल आणि अस्वच्छतेमुळे स्तनदाहसारखे आजार होतात यासाठी उपाययोजना, लसीकरणाचा सर्व तालुक्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
 
लसींचा पुरवठा 
 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांनी सांगितले, की पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्येक तालुक्यांना मोठ्या जनावरांमधील घटसर्प, फऱ्या, शेळ्या-मेंढ्यामधील आंत्रविषार, फाऊल फॉक्स आणि कोंबड्यामध्ये होणाऱ्या रानीखेत आजारांच्या लसमात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. औरंगाबाद, फुलंब्री, गंगापुर, वैजापूर, कन्नड, खुल्ताबाद, सिल्लोड, सोयगाव, पैठण या तालुक्यात घटसर्प व फऱ्या रोगाच्या प्रत्येकी ३३ हजार, आंत्रविषारच्या ६० हजार, फाऊल फॉक्स आजाराच्या ९० हजार तर राणीखेतच्या १ लाख ११ हजार लशींचा पावसाला सुरूवात होण्यापुर्वी पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पशुचिकित्सालयांना ३ लाख २७ हजार लशींचा पुरवठा केल्याचेही त्यांनी सांगितले. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

शंखी गोगलगाय प्राण्यांसाठी घातक 
डॉ. मधुकर मंगळूरकर यांनी सांगितले, की पावसाळ्यात शंखी गोगलगाय (लिम्निया स्नेल) ही परोपजीवींची मध्यस्थ आहे. तिच्यातून जंतांचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः शेळ्या, मेंढ्यांना याचा संसर्ग होतो. जनावरे पाणी पिण्यासाठी नाले, तलाव, डबक्याकडे जातात. या शंखी गोगलगायी कडेला असतात, त्यांच्यामार्फत या जंतांचा प्रादुर्भाव झाल्यावर लिव्हरमध्ये जाताच लिव्हर फ्लूक आजार होतो. यात पचनसंस्थेचे विकार होऊन शेळी, मेंढी दगावू शकते.