esakal | CoronaVirus : अडकलेल्या मजुरांसाठी लायन्स क्लबचा मदतीचा हात 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

-वीस हजार फुटाचा मंडप उभारून केली व्यवस्था
-वीस एसटी बस ने केले मजुरांना रवाना

CoronaVirus : अडकलेल्या मजुरांसाठी लायन्स क्लबचा मदतीचा हात 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास पाचशे मजुरांना लायन्स क्लब ऑफ मीड्टाऊनच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या वीस बस गाड्या द्वारे विविध राज्यांच्या हद्दीपर्यंत पाठविण्यात आले.
लॉकडाऊन मुळे विविध राज्यातील हजारो मजूर विविध भागात अडकून पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये विविध भागात अडकून पडलेले आणि शेल्टर हाऊस मध्ये ठेवण्यात आलेल्या मजुरांना परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने बस गाड्या सोडण्याची घोषणा केली. मात्र या मजुरांना एकत्रित करणे, त्यांच्या याद्या तयार करणे, पोलिसांची परवानगी घेणे हे काम कोणी करावे असा प्रश्न असताना यासाठी लायन्स क्लब ऑफ मिड टाऊन मदतीला धावून आले. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

वीस हजार फुटाचा मंडप 

तापडिया कासलीवाल प्रांगणामध्ये २० हजार फुटाचा मंडप टाकण्यात आला. याठिकाणी मजुरांसाठी वीस तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. थंड पाणी, तसेच दोन वेळ चहा, नाष्टा, जेवण अशी व्यवस्था करण्यात आली. एकत्रित जमा केलेल्या मजुरांच्या याद्या तयार करून पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या प्रवासासाठी परवानगी घेण्यात आली. 

मजुरांची आरोग्य तपासणी 

धूत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जागेवरच सर्व मजुरांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर या मजुरांना सन्मानाने पाठविण्यात आले. विशेष म्हणजे ज्यांना चप्पल नव्हती त्यांना चप्पल देण्यात आल्या, एक हजार लोकांना पांढरे दुपट्टे देण्यात आले. प्रत्येकाला झेंडू बाम, जेवणाचा डबा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्या ही सोबत देण्यात आल्या. मध्यप्रदेशच्या बॉर्डर पर्यंत इच्छापुर येथे, तेलंगणाच्या बॉर्डर पर्यंत बिलोली येथे, छत्तीसगडच्या बॉर्डर पर्यंत अशा विविध मार्गावरील एसटी महामंडळाच्या वीस बस गाड्या सोडण्यात आल्या अशी माहिती महावीर पाटणी यांनी दिली आहे.

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

एसटीची तत्परता 

एसटी महामंडळाने मजुरांना क्षणाचाही विलंब न लावता व्यक्ती बसची उपलब्धता करून दिली यासाठी विभाग नियंत्रक अरुण सीया, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल आहेरे, आगार व्यवस्थापक सुनील शिंदे, प्रवीण गायकवाड किशोर बत्तीसे, बी.एस. बिराजदार, एम. एम. पानपाटील, मोहम्मद सलीम, अविनाश पाटील, श्री श्री. मगरे यांची उपस्थिती होती

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

लॉयन्स क्लबचे टीम

महावीर पाटणी, डॉ. रामेश्वर भारूका, चंद्रकांत मालपाणी, शेखर देसरडा, संजय कासलीवाल, राजेंद्र माहेश्वरी, प्रशांत गांधी, लौकिक कोरेगावकर, भूषण मालपाणी, संजय मंत्री, कुलभूषण जैन, अनिल मुनोत, जगदीश सारडा, राहुल औसेकर, प्रतिक अग्रवाल, डॉ. डागा, विनोद लोहिया, आनंद पाटनी राजकुमार अग्रवाल संजय सारडा यांच्यासह हजारो हात मदतीला