शहरात होम डिलिव्हरी तर ग्रामीण मध्ये थेट विक्री

प्रकाश बनकर
रविवार, 31 मे 2020

औरंगाबाद शहरात केवळ वाईन व बिअर शॉपवरून फक्त होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. फक्त परवानाधारकास ही दारू विकत घेता येणार आहे.

औरंगाबाद: शहर व जिल्ह्यातील मध्य प्रेमींसाठी आनंदाची बातमी. शहरात व जिल्ह्यात सोमवारपासून (ता.१) दारू विक्री सुरू होणार आहे. शहरात होम डिलिव्हरी तर ग्रामीण मध्ये थेट विक्री करणयास मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक एल.के. कदम यांनी "सकाळ'ला दिली.

देशात व राज्यात रेड झोन असलेले शहर सोडता इतर ठिकाणी मद्यविक्री सुरू आहे. मराठवाड्यातील लातूर, जालना, नांदेड येथे मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात व जिल्ह्यात सोमवारपासून परवानगी देण्यात आली आहे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी परवानगीची ऑर्डर राज्य उत्पादन शुल्क विभाग गास पाठवली आहे.

हेही वाचा- खुशखबर 50 हजार तरुणांना रोजगार

औरंगाबाद शहरात केवळ वाईन व बिअर शॉपवरून फक्त होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. फक्त परवानाधारकास ही दारू विकत घेता येणार आहे.

तर ग्रामीण मध्ये वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू, परमिट रूम सुरू होईल मात्र येथून फक्त काउंटर वरूनच हे मद्य विक्री करण्याची मुभा आहे. परमिट रूम व दुकानाच्या आजूबाजूला थांबण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
फिजिकल डिस्टन्स ठेवून व सर्व उपाययोजना करून करून दुकानदारास मद्य विक्री करता येणार आहे. अशी  एल.के. कदम यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquor Home Delivery Aurangabad