वीस मिनिटात... शंभर दुचाकी औरंगाबादेत

अनिल जमधडे
सोमवार, 23 मार्च 2020


-नगर औरंगाबाद रस्त्याचे चित्र
-नागरिक प्रवास टाळेनात 
-लॉकडाऊनचा उद्देश साध्य होईना
-लॉकडाऊन बातमी औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर लॉकडाऊनची घोषणा केली. असे असली तरीही पुणे औरंगाबाद दरम्यान सर्रास दुचाकी धावत आहेत. सोमवारी (ता. २३) अर्ध्या तासात जवळपास शंभर दुचाकी औरंगाबाद शहराच्या दिशेने धावताना दिसल्या. दिवसभरात शेकडो वाहने शहरात आल्याचे चित्र होते  

कोरोना पासून होणारा संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रविवारी (ता. २२) संपूर्ण देशभर जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली होती. जनता कर्फ्युच्या दरम्यान नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जमावबंदीची घोषणा 

जनता कर्फ्यु रविवारी सायंकाळी पाच वाजता संपल्यानंतर पोलिस आयुक्तांनी सकाळी पाच वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी केले. दरम्यान राज्य शासनानेही राज्यभर कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेशाची घोषणा केली. असे असले तरीही प्रत्यक्ष संचार बंदी नसल्याने अनेक जण घराच्या बाहेर पडत आहे. तर अनेकजण प्रवास करताना दिसत आहे. 

वीस मिनिटात शंभर दुचाकी 

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास साधारण अर्ध्या तासामध्ये ८०  ते १०० च्या जवळपास दुचाकी आणि काही चारचाकी वाहने पुणे आणि नगरहुन शहरात दाखल झाले. औरंगाबाद शहराच्या दिशेने येणाऱ्या बहुतांश दुचाकी वर पती- पत्नी आणि मुले अशी स्थिती होती. अनेक दुचाकीवर तरुण-तरुणी तर काही दुचाकीवर तरुण होते. राज्यशासनाने प्रवास टाळा, शक्यतो घरांमध्येच राहा, बाहेर पडू नका अशा विविध सूचना दिल्या आहेत. असे असले तरीही नागरिक अजूनही ऐकायला तयार नाहीत. गरज नसतानाही अनेक जण प्रवास करत आहेत. 

नागरीकांची गंमत

आवश्यकता नसतानाही गंमत म्हणून इकडून तिकडे जाताना अनेकांना आनंद होताना दिसत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर संचारबंदी सारखा कठोर निर्णय शासनाला घ्यावे घ्यावा लागणार आहे. मात्र ही परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. परंतु कर्तव्याची जाण नागरिकांना दिसत नाही, सर्वजण भान विसरून शहराबाहेर आणि घराबाहेरही फिरताना दिसत आहेत.

तपासणी करावी

बाहेरगावाहून शहराकडे येणाऱ्या दुचाकीस्वार आणि अन्य वाहनांची तपासणी आणि चौकशी केली जात नाही, त्यामुळे नागरीकांचा प्रवास थांबायला तयार नाही. त्यामुळे कठोर कारवाई केल्याशिवाय नागरिकांच्या प्रवासावर आळा बसणार नाही अशी सध्याची परिस्थिती दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown News Aurangabad