esakal | पीककर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी ऐन ग्रामपंचायतीच्या धामधूमीत गुन्हे दाखल; विरोधकांना फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

money scam

लोहगाव परिसरारातील चार गावात बँक आँफ महाराष्ट्र बिडकीन शाखेच्या तात्कालिन आधिकारी कर्मचारी दलाल स्थानिकाच्या संगणमताने झालेल्या एक कोटी नऊ लाख एकाहात्तर हजार रूपये बोगस पीककर्ज वाटप घोटाळा झाला आहे.

पीककर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी ऐन ग्रामपंचायतीच्या धामधूमीत गुन्हे दाखल; विरोधकांना फायदा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव परिसरारातील चार गावात बँक आँफ महाराष्ट्र बिडकीन शाखेच्या तात्कालिन आधिकारी कर्मचारी दलाल स्थानिकाच्या संगणमताने झालेल्या एक कोटी नऊ लाख एकाहात्तर हजार रूपये बोगस पीककर्ज वाटप घोटाळा झाला आहे.

या प्रकरणी ७१ शेतकऱ्यांवर ऐन ग्रांमपचायत प्रचार कालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत. तीन गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या पॅनल प्रमुख उमेदवारांना प्रचारासाठी आयते कोलीत मिळाले आहे.

मुलानीवाडगाव, ढाकेफळ, औरंगपूरबुट्टेवाडी,तारूपिपंळवाडी येथील शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी नंतर खरीप हंगामासाठी बिडकीन बँक आँफ महाराष्ट्र शाखेकडे पीक कर्ज मागणी नुसार तात्कालीन शाखाधिकारी, धिरजकुमार,कर्मचारी स्थानिक नेते दलालाच्या साखळीने  ७१ शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी बनावट ऑनलाईन बोगस,सातबारे, इतर कागदपत्राचा वापर करून १ कोटी नऊ लाख ७१ हजार रूपयाचे कर्ज वाटप घोटाळा केल्याचा प्रकार बँक व्यवहार तपासणीत समोर आला होता.

जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी अभयकुमार दुबे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात शनिवार (ता.७)  फिर्याद दिल्यावरून रात्री ७१ शेतकऱ्यांवर संगणमताने फसवणूक, बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात बँकेने तात्कालीन शाखाधिकारी, कर्मचारी, बनावट कागदपत्रे बनवनारे दलालाना मात्र अभय मिळाल्याने व शेतकऱ्यांनाच आरोपी केल्याने नागरिकांनी शंका व्यक्त केल्या आहे.

दरम्यान  मुलानीवाडगाव, ढाकेफळ, औरंपुरबुट्टेवाडी येथील ऐन ग्रामपंचायत निवडणूक काळात उमेदवारावर व माजी पदाधिका-यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे  एकमेकांच्या विरोधात निवडणूक पँनल केलेल्याना प्रचारासाठी आयते कोलीत मिळाल्याने प्रचाराची रंगत रंगल्याचे चित्र शनिवार (ता.९)बघावयास मिळाले.

शिवसेना म्हणते, संभाजीनगर आणि कॉंग्रेस म्हणते औरंगाबाद; भाजपच्या राजू शिंदेंचा टोला

दरम्यान कर्ज मंजुरीसाठी  शेतक-याचे खोटेनाटे आँनलाईन बनावट सातबारे दस्तावेज बनवणारे व कर्ज मंजुरीतुन ठराविक रक्कमेचा आर्थिक फायदा घेणारे बँक आधिकारी, कर्मचारी दलालवर कारवाई करावी अशी मागणी या  शेतक-यांनी केली आहे.

(edited by- pramod sarawale)