अनैतिक संबंधात अंध पती ठरायचा अडसर, मग...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी गज, काठी, काडेपेटी व पेट्रोलची रिकामी बाटली जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सोशल मीडियावर मृताचा फोटो व्हायरल केला. त्यावरून एका पत्रकाराने ही व्यक्ती कसाबखेडा येथील असल्याचे पोलिसांना सांगितले.

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील तिडी शिवारात अंध व्यक्तीच्या खुनाचा सहा तासांत उलगडा झाला. डोक्यात गजाने वार केल्यानंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अनैतिक संबंधात अंध पती अडसर ठरत असल्याने पत्नीच्या प्रियकराने त्याचा काटा काढला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, यासीन शेख वजीर शेख (रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) असे मारेकऱ्याचे नाव आहे.  तिडी-सवंदगाव रस्त्यावर रघुनाथ डुकरे यांच्या शेतात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास सय्यद अशरफ सय्यद नूर (रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी गज, काठी, काडेपेटी व पेट्रोलची रिकामी बाटली जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सोशल मीडियावर मृताचा फोटो व्हायरल केला. त्यावरून एका पत्रकाराने ही व्यक्ती कसाबखेडा येथील असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कसाबखेड्यात कुटुंबीयांचा शोध घेतला. तेव्हा कुटुंबीयांनी सय्यद अशरफ तीन दिवसांच्या जांभाळा येथील इज्तेमामध्ये गेल्याचे सांगितले होते. त्याला पहाटे नेत खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सय्यद अशरफ यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. संशयित यासीन शेख याला कसाबखेड्यातून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांनी तपासचक्रे फिरविली. 

संशयिताने दिली कबुली 

यासीन शेख याला कसाबखेड्यातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु खाक्या दाखवताच त्याने सय्यद अशरफ यांच्या पत्नीसोबत पाच ते सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सय्यद अशरफ हा त्यांच्या संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lover kills Her Blind Husband Brutely