मराठवाड्यात १५८ जणांना कोरोनाची लागण, उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू

मनोज साखरे
Saturday, 6 February 2021

औरंगाबादेत ४०, नांदेड १२, परभणी ५, हिंगोली २, जालना २३, बीड ३३, लातूर २९, उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारी (ता.पाच) दिवसभरात १५८ कोरोनाबाधित आढळले. त्यात औरंगाबादेत ४०, नांदेड १२, परभणी ५, हिंगोली २, जालना २३, बीड ३३, लातूर २९, उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, लातूरमध्ये दोन, औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार १६० झाली असून सध्या १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४५ हजार ७६९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

शहरातील बाधित : नक्षत्रवाडी (२), बीड बायपास (१), क्रांती चौक (१), आरेफ कॉलनी (१), गजानन कॉलनी (१), जटवाडा रोड (१), एन नऊ एम दोन (१), शालीमार बाग (१), एन चार सिडको (१), एसबीआय क्वार्टर (१), गारखेडा (१), सुराणानगर (१), एन एक सिडको (१), पदमपुरा (१), पडेगाव (१), अन्य (१९). ग्रामीण भागात, खामगाव, फुलंब्री (१), अन्य (४).

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Corona Update 158 Corona Cases Reported Aurangabad News