मृत्यूसोबत खेळू नका, घरातच रहा असं कोण म्हणाले

शेखलाल शेख
Monday, 30 March 2020

लहान मुले, जेष्ठांची काळजी घ्या त्यांना घरातून बिलकुल बाहेर पडू देवू नका असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. 

औरंगाबाद : शासन, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, गरज असेल तरच बाहेर या. कोरोना अतिशय घातक असल्याने सगळ्यांनी याला गांभीर्याने घ्यावे, कुणीही मृत्यूसोबत खेळण्याचा प्रयत्न करु नका. बाहेर फिरुन तुम्ही स्वतःसोबत शहराला सुद्धा संकटात ढकलत आहात. सगळ्यांनी घरातच बसावे, असे आवाहन खासदार इम्जियाज जलील यांनी सोमवारी (ता.३०) केले. 

लाकडाऊन जाहिर झालेले असले तरी काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर तरुण फिरतात. प्रशासनाने घरातच राहण्याच्या सूचना दिलेल्या असतांना काही जण घरात बसत नाही. अनेक ठिकाणी टोळक्याने बसून गप्पा मारतात.

हेही वाचा- शिर्डी संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले 51 कोटी

शिवाय अंतर्गत रस्त्यावर लहान मुले सुद्धा फिरतांना दिसत आहे. त्यामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट रस्त्यावर येऊन सर्वांना अतिशय कडक सूचना केल्या. विनाकारण लोक रस्त्यावर का फिरत आहे. उद्या काही झाले तर तुमच्या मदतीसाठी कोण पुढे येईल. प्रत्येक ठिकाणाच्या जबाबदार असलेल्या व्यक्तींनी सर्वांना घरातच राहण्याच्या सूचना कराव्यात.

तुम्ही कोणत्या संकटा सोबत खेळत आहात याचे भान ठेवा. आई-वडीलांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना घरातच ठेवावे. खुपच गरच असेल तर बाहेर पडा. लहान मुले, जेष्ठांची काळजी घ्या त्यांना घरातून बिलकुल बाहेर पडू देवू नका असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Member Of Parliament Imtiaz Jaleel Aurangabad News