esakal | एमआयएमने काढली औरंगाबादेत रॅली, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

MIM Rally In Aurangabad2

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकत घवघवीत यश मिळावल्याने औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आझाद चौक ते बुढीलाईन येथील पक्षाचे कार्यालय दारुस्ससलामपर्यंत रॅली काढली.

एमआयएमने काढली औरंगाबादेत रॅली, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकत घवघवीत यश मिळावल्याने औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आझाद चौक ते बुढीलाईन येथील पक्षाचे कार्यालय दारुस्ससलामपर्यंत रॅली काढली. सीमांचलने `धपा धप दिया`, अशा शब्दांत खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल ट्विट केले.

भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरसाठी अर्ज दाखल, बोराळकरांसमोर आवाहन?

एमआयएमने सीमांचल भागातील २१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवलेल्या या पक्षाने यावेळी मात्र जोरदार मुंसडी मारत पाच जागा जिंकल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी तब्बल दोन आठवडे प्रचार केला होता.
यशाबद्दल इम्तियाज जलील म्हणाले, की सीमांचल भागात एमआयएमने २१ जागांवर उमेदवार दिले होते. या शिवाय बसपा आणि अन्य पक्षाची आमची आघाडीदेखील होती. गेल्यावेळी पोटनिवडणुकीत आम्ही एक जागा जिंकलो होतो, आता पाच जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे.

Edited - Ganesh Pitekar