Video : मी प्रश्न सोडवायला आलोय, राजकारण करायला नाही...

योगेश पायघन
Thursday, 13 February 2020

डीएमआयसी प्रकल्पाच्या सोयीसुविधा व त्यांचे कार्यक्षेत्र श्री. ठाकरे यांनी समजून घेतले. यावेळी स्वच्छतागृह व डेन्स फॉरेस्ट लावण्यासंबंधी सूचनाही त्यांनी केल्या.

औरंगाबाद : "मी इथले प्रश्‍न सोडवण्यासाठी आलो आहे. राजकारणासाठी नाही. निवडणुकीच्या वेळी येईल, तेव्हा राजकारणावर बोलेल,'' असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 13) म्हणाले. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा मुद्दा मनसेने हायजॅक केल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी बोलणे टाळले. 

दोन चुलत बहिणींना पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या...

पर्यटन, महापालिका व नागरी सोयीसुविधांसाठी आयोजित बैठकीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शहरात आले आहेत. दरम्यान, चिकलठाणा विमानतळावर उतरल्यावर नियोजनानुसार त्यांनी डीएमआयसीतील ऑरीक हॉलला भेट दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, एमआयडीसीचे राजेश जोशी, रविंद्र कुलकर्णी, भूषण हर्षे, ऑरीकचे संजय काटकर, महेश शिंदे, विष्णु लोखंडे यावेळी उपस्थित होते. 

तुमच्यासाठी नाही बरं का पाच दिवसांचा आठवडा

डीएमआयसी प्रकल्पाच्या सोयीसुविधा व त्यांचे कार्यक्षेत्र श्री. ठाकरे यांनी समजून घेतले. यावेळी स्वच्छतागृह व डेन्स फॉरेस्ट लावण्यासंबंधी सूचनाही त्यांनी केल्या. त्याविषयी काही तरतुदी सध्या असून, त्या लवकरच राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर काही नव्या सूचनांचा समावेशासाठी विचार केला जाईल, असेही यावेळी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले. 

कनेक्‍टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न

डीएमआयसीची कनेक्‍टिव्हिटी वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करावे, शेंद्रा-बिडकीन रस्ता नॅशनल हायवेने टाळल्याने तो राज्य शासनाने विकसित करावा, तसेच समृद्धी महामार्गाला डीएमआयसी जोडले जाऊन त्यासाठी एक स्वतंत्र चौक बनवण्यात यावा, अशा मागण्या यावेळी अधिकाऱ्यांनी केल्या. त्यावर कनेक्‍टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करु. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवा, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या. 

ताफा थांबवून कामगारांसह सेल्फी

ऑरिक हॉलवरुन निघालेला ताफा शंभर मिटर अंतरावर उभ्या असलेल्या काही कामगार व त्यांच्या मुलांनी अडवला. आदित्य ठाकरे यांच्यासह सेल्फी काढण्याची त्यांची इच्छा होती. आदित्य ठाकरे यांनीही ताफा थांबवून गाडीखाली उतरून त्या मुलांसोबत सेल्फी काढला. त्यानंतर गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. 

हेही वाचा - म्हणून चंद्रकांतदादा म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Aditya Thackeray Aurangabad Politics News