अवास्तव शुल्क आकारल्याने जैन इंटरनॅशनल शाळेत तोडफोड करणाऱ्या मनसेच्या ‘त्रिकूटां’ना जामिन मंजूर

सुषेन जाधव
Sunday, 18 October 2020

शाळेची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या तिघां कार्यकर्त्यांविरोधात दाखल गुन्ह्यात अटक झाल्यानंतर न्यायालयात धाव घेण्यात आली असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी तिघा संशयितांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामिन अर्ज मंजूर केला.

औरंगाबाद: पालकांकडून अवास्तवर शुल्काची वसूली, त्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, शुल्क न भरल्यास ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे असे प्रकार शहानूरवाडीतील जैन इंटरनॅशनल शाळेत सुरू असल्याच्या प्रकाराचा प्राचार्यांना जाब विचारत मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांनी शाळेत तोडफोड केली होती.

या प्रकरणी तिघांविरोधात दाखल गुन्ह्यात अटक झाल्यानंतर न्यायालयात धाव घेण्यात आली असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी तिघा संशयितांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामिन अर्ज मंजूर केला. 

शरद पवारांच्या दौऱ्यात आमदार चौगुले यांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली

या प्रकरणी जैन इंटरनॅशनल शाळेचे प्राचार्य संतोष कुमार यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राजीव जावळीकर, मंगेश साळवे, कार्तिक फरकाडे यांनी शाळेत येऊन तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना शनिवारी (ता.१७) ताब्यात घेऊन रविवारी (ता.१८)  न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान पोलिसांतर्फे संशयितांना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. 

दरम्यान न्यायाधीश पांडव यांनी अमान्य करत संबंधित कार्यकर्त्यांचा सदर आंदोलनाचा एक भाग होता, त्यामुळे त्यांच्या ताब्यातून काही हस्तगत करण्यासारखे नसल्याने संशयितांना पोलिस कोठडीत ठेवण्याची आवश्‍यकता नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती अर्जदाराचे वकील ॲड. अभयसिंह भोसले यांनी दिली. पोलिसांनी सदर संशयितांना ताब्यात घेतल्यापासून १० ते १२ तासांपासून तिघेही पोलिसांच्याच ताब्यात होते असा युक्तीवाद भोसले यांनी न्यायालयात केला. सुनावणीअंती प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचक्यासह दोन आठवड्यापर्यंत प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर नियमित जामिन मंजूर केला. 

कर्जाचा डोंगर त्यात नापिकीने गणेश खचला आणि संपविली जीवनयात्रा, जालन्यातील घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Activist Regular Bail Granted By Court Aurangabad News