esakal | कर्जाचा डोंगर त्यात नापिकीने गणेश खचला आणि संपविली जीवनयात्रा, जालन्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh aatmhatya.jpg

जालना जिल्ह्यात तरुण शेतकर्याची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना. सहा महिन्यांपुर्वीच सुरु केला होता संसार.  

कर्जाचा डोंगर त्यात नापिकीने गणेश खचला आणि संपविली जीवनयात्रा, जालन्यातील घटना

sakal_logo
By
प्रकाश धमाले

पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालूक्‍यातील देहेड येथील तरुण शेतकर्याने नापीकी, त्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे रविवारी (ता.18) पहाटे समोर आले. गणेश गंजीधर बावस्कर (वय27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

 मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


गणेश यांचे पाच महिण्यांपुर्वीच लॉकडाऊनच्या काळात पाच जणांच्या साक्षीने विवाह झाला होता. वडीलांचे छत्र आधीच गेलेले होते. घरात एकटाच कर्ता पुरुष असल्याने सर्व जबाबदारी त्याने अल्पावधीतच स्वीकारली होती. दरम्यान विवाहानंतर तो आई, पत्नी, दोन बहीणीसह सुखी संसारात होता. आपल्या अडीच एकर शेतीत भरपूर कष्ट करायचा. मात्र कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ त्यात बॅंकांचे कर्ज, उसनवारी यामुळे सतत चिंतेत राहत होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शनिवारी (ता.17) रात्रीची वीज असल्याने तो कपाशीला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. सततच्या चिंतेने अखेर त्याच्या मनात आत्महत्य़ेचा विचार आला. कपाशीत असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. भोकरदन पोलिसात घटनेची नोंद करून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नापीकी, अतिवृष्टी आणि दौरे, आत्महत्या थांबवतील ? 

मराठवाड्यात दरवर्षी शेक़डो शेतकरी नापीकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे समोर येत आहे. त्यात दोन दिवसांपुर्वीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने लातूर जिल्ह्यातील तीन शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. तसाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात देखील घडला असून कन्नड व फुलंब्री तालुक्यातील दोन शेतकर्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तोच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील गणेश केलेल्या आत्महत्येने पुन्हा मन हेलावून टाकले आहे. एकीकडे नापीकी त्यात अतिवृष्टी आणि राजकीय मंडळींचे मराठवाड्यात सुरु झालेले दौरे यातून शेतकरी आत्महत्या थांबतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)