
आसेगाव (ता.गंगापूर) येथे घरगुती वादातून आईने मामाच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दौलताबाद (जि.औरंगाबाद) : आसेगाव (ता.गंगापूर) येथे घरगुती वादातून आईने मामाच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता.दोन) घडली. या प्रकरणी मंगळवारी (ता.तीन) दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शामराव शेळके (वय ३५, रा.आसेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.
जैन इंटरनॅशन, युनिर्व्हसल स्कूलची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला पाठविण्यात
येथील कृष्णा शामराव शेळके हा सोमवारी रात्री साडेआठ वाजता बेशुद्ध अवस्थेत त्याच्या राहत्या घरी पडलेला असल्याची माहिती दौलताबाद पोलिस ठाण्यात मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलिस उपनिरीक्षक रवी कदम आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता घटनास्थळी कृष्णा शेळके हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला बेशुद्ध अवस्थेत पोलिस अंमलदार अशोक शेळके, सचिन त्रिभुवन, श्री.कांडेकर यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कृष्णाला मृत घोषित केले.
सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार कृष्णा शेळके हा त्याची पत्नी, आई व दोन मुले दीपक व विशाल यांच्यासोबत राहत होता. त्याचा एक भाऊ नाशिक येथे एका कंपनीमध्ये काम करतो. कृष्णा हा दारूच्या आहारी गेला होता. त्याच्याकडे साडेतीन एकर जमीन होती. त्यापैकी त्याच्याकडे २० गुंठेच जमीन शिल्लक राहिली होती. जमीन विकून टाकली व रोज तो दारू पिऊन घरी आल्यावर पत्नी, आई व मुलांना मारहाण करायचा असे रोजचे झाले होते. सोमवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या वेळी कृष्णा दारू पिऊन घरी आला व पत्नी व आईला मारहाण करू लागला.
पत्नी त्याच्या तावडीतून सुटून पळून गेली. आई घरातून बाहेर जाऊ नये म्हणून कृष्णाने घरातील तिन्ही दरवाजे लावून घेतले व आईचा गळा दाबले. पत्नीचा आरडाओरडा ऐकूण आजूबाजूला असलेले लोक जमा झाले व नातेवाईक पंढरीनाथ बाबुराव जाधव व बाजुच्या लोकांनी घराचे दरवाजे तोडून आत जाऊन पंढरीनाथ यांनी कृष्णाला मारण्यास सुरवात केली व आई तुळसाबाई यांनी मुलगा कृष्णाच्या डोक्याच्या बाजूला फटीने मारले.
लोकांनी आईची त्याच्या तावडीतून सुटका केली. सुटका होताच आई-मुलीकडे निघून गेली. हे प्रकरण नेहमीचे असल्याने जो तो आपल्या घरी निघून गेले. रात्री साडेआठ वाजता कृष्णाच्या घरात बाजुच्या लोकांनी डोकावून पाहिले असता कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता व सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. वंदना कृष्णा शेळके यांच्या फिर्यादीवरून आई तुळसाबाई शामराव शेळके व मामा पंढरीनाथ जाधव यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री आडे या करित आहेत.
संपादन - गणेश पिटेकर