घरातून बाहेर पडतांना किमान आपल्या आई वडीलांचा तरी विचार करा

शेखलाल शेख
Sunday, 19 April 2020

किराडपुरा परिसरामध्ये कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला तरीही लोक सहकार्य करत नसल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर खासदार इम्जियाज जलील यांनी गल्लोगल्ली जाऊन लोकांना घरातच राहण्याची विनंती केली.

औरंगबादः शहरात आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागणा झाली आहे. तर तिघांना आपला जीव गमावावा लागला. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन लोकांना यापासून वाचविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ)तर्फे शहराच्या विविध भागात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. किराडपुरा भागात खासदार इम्तियाज जलील यांनी लोकांना घरात राहण्याचे, नियम पाळण्याचे, तसेच घरातून बाहेर निघण्यापुर्वी किमान आपल्या आई-वडील, लहान मुलांचा तरी विचार करा त्यांचा जीव धोक्यात घालु नका असे आवाहन केले. 

 किराडपुरा परिसरामध्ये कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला तरीही लोक सहकार्य करत नसल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर खासदार इम्जियाज जलील यांनी गल्लोगल्ली जाऊन लोकांना घरातच राहण्याची विनंती केली. संचारबंदी असतांना ही लोका नियम पाळत नाही.

हेही वाचा- व्हीडीओ काॅलवरुन आईचे अंत्यदर्शन

आज पोलिस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून काम करत आहे. घरी बसून त्यांना सहकार्य करावे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बाहेर पडून स्वतःचे जीव व दुसऱ्यांचे हि जीव धोक्यात टाकू नका. घराबाहेर निघण्यापूर्वी एकदा आपल्या आई वडिलांकडे पहा, लहान मुलांकडे पहा, स्वतःच्या जीवाची नाही तर किमान त्यांचा जीव वाचविण्यासाठी घरीच बसा. आपल्या घरी बसले तर ईद चांगली साजरी करु. तुमची छोटीशी चुक तुम्हाला मृत्युच्या दारात घेऊन जाईल त्यामुळे पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले. 

डब्ल्यूएचओ ने सेल्फलेस हेलपिंग हॅन्ड्स या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने जनजागृती केली. या प्रसंगी डब्ल्यू. एच. ओ. चे क्षयरोग विभागाचे सल्लागार संजय सूर्यवंशी, सर्व्हेलिअन्स मेडिकल ऑफिसर डॉ. मुजीब, इसाक, हाजी इसाक, सोहेल झकीऊद्दीन, मोईज इकबाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Imtiaz jaleel Say Stay Home Kiradpura Aurangabad