Good News : औरंगाबाद महापालिका करणार नऊ रस्त्यांची कामे

Municipal Corporation Will Make Roads
Municipal Corporation Will Make Roads

औरंगाबाद - राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५२ कोटी रुपयांच्या निधीतून महापालिका शहरातील नऊ रस्त्यांची कामे करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. सोमवारी महापालिकेने ४१ कोटी ३३ लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. यापूर्वीच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळाने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडे महापालिकेला १५२ कोटी २४ लाख रुपयांचा 
निधी नुकताच मंजूर केला़ आहे. त्यातून २० रस्त्यांची २२ किलोमीटर लांबीची कामे केली जाणार आहेत. ही कामे दर्जेदार व वेळेत व्हावीत यासाठी राज्य शासनाने महापालिका, औद्योगिक विकास महामंडळ व रस्ते विकास महामंडळाला विभागून निधी दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने सात रस्तेकामांच्या सुमारे ५३ कोटी रुपयांच्या, त्यापाठोपाठ औद्योगिक विकास महामंडळानेही ४१ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासन मागे पडले होते. त्यात सोमवारी महापालिकेने नऊ रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या. या निविदा भरण्यासाठी नऊ मार्चची वेळ देण्यात आली आहे. निविदापूर्व बैठक दोन मार्चला सकाळी ११ वाजता आयुक्त यांच्या दालनात होईल, असे निविदेत नमूद करण्यात आले आहे. 

निधी १५२ कोटी,  निविदा १३५ कोटींच्या 

राज्य शासनाने रोड फर्निचरसह १५२ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र तीनही विभागांनी काढलेल्या निविदांची किंमत सुमारे १३५ कोटी रुपये एवढीच होत आहे. त्यामुळे उर्वरित निधी गेला कुठे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

हे आहेत रस्ते 
 

  • वोक्हार्ट ते जयभवानी चौक, नारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे व रेल्वेस्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह येथील रोडचे पुनर्डांबरीकरण करणे (किंमत ८,२८,८४,७०३) 
  • दीपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे काँक्रिटिंग करणे, रेल्वेस्टेशन फ्लायओव्हर येथील रोडचे पुनर्डांबरीकरण करणे (किंमत १५,०२,९१८२५) 
  • पुंडलिकनगर टाकी ते एन-तीन, एन-चारमधील हायकोर्ट ते कामगार चौक मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटिंग करणे (किंतम २,५०,४३,१२५) 
  • भवानी पेट्रोलपंप एन-२ ते सी-सेक्टर मुख्य रस्ता ठाकरेनगर, एन-२, सिडको रस्त्याचे कॉक्रिटिंग करणे (किंमत १,८०,९८,६६७) 
  • महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (किंमत १,४४,३४,३१२) 
  •  अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साईज ऑफिस रस्त्याचे डांबरीकरण करणे (किंमत २,७८,५५,५७१) 
  •  जालना रोड ते  अॅक्स हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटिंग करणे (किंमत २,६७,३०,१३३) 
  • जळगाव रोड ते अजिंठा अॅम्बेसिडर  रस्त्याचे डांबरीकरण करणे (किंमत १,५२,९५,३९६) 
  • अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण करणे (किंमत ५,३२,४६२१८) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com