esakal | दुर्गामातेच्या दीप ज्योतीला मुस्लिम महिलांनी अर्पण केले तेल, औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Durga Mata Jyot

लोहगाव (ता.पैठण) येथे रविवारी (ता.२५) सायंकाळी सुर्यास्तावेळी पारंपरिक पद्धतीने विजयादशमी सण मोठ्या उत्साहात सामाजिक ऐक्याचे प्रतिक जपत सर्व धार्मियानी एकमेकांना शुभेच्छा देत साजरा करण्यात आला.

दुर्गामातेच्या दीप ज्योतीला मुस्लिम महिलांनी अर्पण केले तेल, औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचे दर्शन

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) येथे रविवारी (ता.२५) सायंकाळी सुर्यास्तावेळी पारंपरिक पद्धतीने विजयादशमी सण मोठ्या उत्साहात सामाजिक ऐक्याचे प्रतिक जपत सर्व धार्मियानी एकमेकांना शुभेच्छा देत साजरा करण्यात आला. सीमोलंघनासाठी सायंकाळी कोरोना पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवत हनुमान मंदिरापासून वाजत-गाजत दुर्गामाता पुजन सोहळ्याची मर्यादित भक्तांचा सहभाग असलेली मिरवणूक काढण्यात आली.

अतिवृष्टीग्रस्तांना या निकषावर मिळणार मदत, उद्यापर्यंत नुकसानीचा मिळणार अहवाल

या प्रसंगी दुर्गामातेचा जयघोष करण्यात आला. त्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर सर्व धार्मिय महिलांनी विशेष म्हणजे मुस्लिम महिला, कन्यांनी मातेच्या ज्योतीला तेल अर्पण करत सामाजिक एकतेला बळकटी दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तरूण पिढीला आदर्श देणारा सण म्हणून ख्याती राहील असा संदेश यातून मिळाला. ही मिरवणूक दुर्गामाता मंदिराजवळ विसर्जित झाली. त्यानंतर एकमेकांना नैसर्गिक सोन्याचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंढरीनाथ बोरूडे, सर्जेराव काळे, सिताराम जगताप, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रेमनाथ जगधने, कचरू जगधने, बाळु पवार, रामनाथ पाबळे, भारत बोरूडे, आत्माराम पाबळे, दत्ता शिदे आदींनी सहभाग झाले होते.

संपादन - गणेश पिटेकर