पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठवाड्यातील नागरिकांना दाखवलेले स्वप्न राहणार स्वप्नच?

ई सकाळ टीम
Monday, 1 February 2021

ती पूर्ण व्हावी यासाठी तरतूद केली जाईल अशी अपेक्षा मराठवाड्यातील नागरिकांची होती.

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकासाला केंद्रीय अर्थसंकल्पात ठेंगा दाखवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोलापुरात केली होती. ती पूर्ण व्हावी यासाठी तरतूद केली जाईल अशी अपेक्षा मराठवाड्यातील नागरिकांची होती. मात्र त्याचा भ्रमनिरास झालेला दिसतो. परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबादचे पीटलाईन, रोटेगाव-चाळीसगाव, औरंगाबाद-दौलताबाद- चाळीसगाव रेल्वेमार्ग प्रश्न जैसे था राहिला आहे.

 

  • तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • आता दोन वर्षे पूर्ण
  •  निधीअभावी कामातही प्रगती
  • तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दक्षिण आणि उत्तर भारतातून भाविक मोठ्या संख्येने येतात.
  • तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर आल्याने भाविकांसह पर्यटनाला वाव
  • मोदींच्या घोषणेनंतरही आतापर्यंत पावले उचलली न गेल्यामुळे जिल्ह्यातून संताप
  • पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम निधीअभावी रखडले
  • भूसंपादनासाठी नवीन संस्था व रेल्वे मार्गाची गणना करण्याची प्रक्रिया केवळ पाच कोटींच्या निधीअभावी प्रलंबित
  •  तीस वर्षांपूर्वी सोलापूर-जळगाव हा रेल्वे मार्ग सुरु करण्याची मागणी पहिल्यांदा पुढे आली होती. सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाची मागणी लावून धरताना तुळजापूरसह पुढे पैठण, घृष्णेश्वर, अजिंठा आदी पर्यटनस्थळांना जोडण्याचा विचार मांडण्यात आला होता. सोलापूर-जळगाव या नव्या रेल्वेमार्गासाठी २००८-०९ मध्ये प्राथमिक सर्वेक्षणही झाले. त्यावेळी मराठवाड्यातील जोडण्यासाठी आणि मराठवाड्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी तुळजापूरहून जाणारा सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. एकूण ४६८ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आणि निधी मिळण्यासाठी २०१२ मध्ये रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi's Announcement Of Railway Routs Not Come Into Reality Union Budget