esakal | शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Janaakrosh Andolan

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा भगाओ देश बचाओ, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, किसानों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान में, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पक्षाचे विजय साळवे म्हणाले, की गारठणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करित आहेत. हे आंदोलन ३७ दिवसांपासून सुरु आहे. कृषीविषयक काळे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. मोदी सरकारला देशातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेण नाही. कृषी कायद्यांमुळे उद्योगपतींच्या घशात शेती टाकण्याचा उद्देश आहे. आगामी दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन तीव्र करेल अशी माहिती श्री. साळवे यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर