esakal | औरंगाबाद जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पती, पत्नी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) शिवारातील बायपास रस्त्यावर घडली.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पती, पत्नी जखमी

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) शिवारातील बायपास रस्त्यावर घडली. बाबासाहेब भिकाजी सोहळे (वय ६०),  पत्नी निर्मला बाबासाहेब सोहळे (वय ५५, दोघे रा. औरंगाबाद) हे दुचाकीने (एमएच २० ईएम ६६५९) शनिवारी (ता.दोन) दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद कडून अंबडकडे जात होते.

त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांची पत्नी निर्मला गंभीर जखमी, तर बाबासाहेब सोहळे हे किरकोळ जखमी झाले. यावेळी महामार्ग पोलिस जनार्धन राठोड, सुनिल काकड, सुनिल कोठूळे हे जवळच असल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य करीत आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांनतर येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर असलम सय्यद, चालक नासेर सय्यद यांनी पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले.

संपादन - गणेश पिटेकर