धंद्याचा अजब फंडा.. दारू दुकान फोडायचे अन् ब्लॅकमध्ये विकायचे! 

मनोज साखरे
मंगळवार, 31 मार्च 2020

मद्यालये बंद आहेत, पण दारुची मागणी तर आहेच. एकाने तर व्हिडीओतुन दारुची दुकाने उघडण्याची मागणी केली. हे सोशल मिडियावरील प्रतिक्रीयावरून आणि पोलिसांनी दारु विक्रेत्यांवर केलेल्या कारवायातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांना आता या दुकानांजवळ अधीकची गस्त घालावी लागणार आहे. 

औरंगाबाद - एकीकडे कोरोनाचा कहर वाढत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे पोलिस रस्त्यावर गस्त घालत आहेत. सर्वत्र दारुची दुकाने बंद असताना मद्यपींचा त्रागा वाढला आहे. अशा स्थितीतही चोरांनी दारुचा काळाबाजार सुरु केल्याचे प्रकार समोर येत आहेत.

दारुचे दुकान फोडायचे, दारु चोरायची आणि ब्लॅकमध्ये ती विकून पैसे मिळवायचे असे प्रकारही चोर आता करु लागले आहेत. अशाच पद्धतीने सोलापुरमध्ये व औरंगाबादच्या वाळूज भागातही चोरांनी परमीट रुम फोडल्याची घटना २९ मार्चला सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. यात चोरांनी तब्बल एक लाख ७२ हजारांची दारु चोरी केली. 

देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे चोरांना दागिने डोळ्यांसमोरही दिसले तरी ते भविष्यासाठी उपयोगाचे असेलच पण तुर्तास त्याचा पोट भरण्यासाठी उपयोग नाही. दागिण्यांचे घबाड अथवा एखादी वस्तू जरी हाती लागली तरीही लॉकडाऊनमुळे अशा दागिण्यांचा, वस्तूचा व्यवहार ठप्प असल्याने चोरांचे तिकडे फारसे लक्ष नाही.

मद्यालये बंद आहेत, पण दारुची मागणी तर आहेच. एकाने तर व्हिडीओतुन दारुची दुकाने उघडण्याची मागणी केली. हे सोशल मिडियावरील प्रतिक्रीयावरून आणि पोलिसांनी दारु विक्रेत्यांवर केलेल्या कारवायातून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांना आता या दुकानांजवळ अधीकची गस्त घालावी लागणार आहे. 

 औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असे आहे अर्थकारण.. 

लॉकडाऊनमुळे दारू दुकान आणि बिअर शॉपी, मद्यालये बंद आहेत. दुसरीकडे ज्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे, ते अस्वस्थ होत आहेत. अशांकडून अक्षरशः सोशल मीडियावर व्हिडिओ, पोस्ट करून त्या माध्यमातून ते आपली भावना व्यक्त करीत असल्याचेही दिसून येत आहे. बिअरशॉप, दारू दुकान फोडून तीच दारू चोरट्या मार्गाने विकायची आणि पैसा मिळवायचा हा एक उद्देशही दुकान फोडणाऱ्यांचा असल्याचे दिसून येत आहे. 

काय आहे स्थिती? 

अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यांची वानवा नाहीच. आता लॉकडाऊनमध्ये दारूचा प्रवास चोरट्या मार्गाने सुरु आहे. दरदिवशी एक ते दोन जणांना पोलिस पकडत असून त्यांची दारू जप्त केली जात आहे. दारूचे दुकान फोडून चोरी करायची आणि दारू ब्लॅकमध्ये चढ्या भावाने विक्री करायची अशी शक्कलच आता लढविली जात आहे.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Style Of Liquor Theft In Coronavirus Lockdown