esakal | रिफाइंड तेल विषासमान, घाण्याचे तेल सर्वोत्तम : डॉ. नरसिंह वर्मा
sakal

बोलून बातमी शोधा

oil

जे तेल खायला नको, ते तेल खाण्यास सुरवात झाली. घाण्याच्या तेलामध्ये फॅटसह इतर आवश्‍यक घटकही असतात. त्यातुलनेत रिफाइंड हे फक्त विष असते. फॅटला वगळून फक्त ग्लुकोजवर पेशी, हार्मोन, हृदय आणि स्नायू तग धरू शकत नाहीत.

रिफाइंड तेल विषासमान, घाण्याचे तेल सर्वोत्तम : डॉ. नरसिंह वर्मा

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद : डॉक्‍टरांना अभ्यासक्रमात काय खावे व काय खाऊ नये याबद्दल काहीही शिकविले जात नाही. प्रामुख्याने तेलाच्या निवडीसंदर्भात संभ्रम आहे. रिफाइंड तेल हे विषासमान असून घाण्याचे तेल सर्वोत्तम आहे, असे मत डॉ. नरसिंह वर्मा यांनी व्यक्त केले.

आयएमए व औरंगाबाद मधुमेह तज्ज्ञ संघटनेतर्फे आयोजित स्वयंपाकघरातील तेलाची निवड या विषयावर आयोजित व्याख्यानात सोमवारी (ता. 24) आयएमए हॉलमध्ये ते बोलत होते. डॉ. यशवंत गाडे, डॉ. सत्यनारायण सोमाणी, डॉ. अनुपम टाकळकर आदींची उपस्थिती होती. 

डॉ. वर्मा म्हणाले, की काही दशकांपूर्वी शुद्ध तूप आणि घाण्याचे तेल मुबलक प्रमाणात वापरले जात होते. मात्र, नफेखोर कंपन्यांचा या क्षेत्रात प्रवेश झाल्यानंतर रिफाइंड तेलाचाही लोकांच्या स्वयंपाकघरात प्रवेश झाला. त्यामुळे आजारांचाही शिरकाव झाला. जे तेल खायला नको, ते तेल खाण्यास सुरवात झाली.

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

घाण्याच्या तेलामध्ये फॅटसह इतर आवश्‍यक घटकही असतात. त्यातुलनेत रिफाइंड हे फक्त विष असते. फॅटला वगळून फक्त ग्लुकोजवर पेशी, हार्मोन, हृदय आणि स्नायू तग धरू शकत नाहीत. वेळीच सावध होऊन रिफाइंड तेल सोडून घाण्याच्या तेलाकडे वळण्याची वेळ आलेली आहे. प्रास्ताविक डॉ. संजीव इंदूरकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मयूरा काळे यांनी केले. आभार डॉ. राहुल बडे यांनी मानले. 

तेल नव्हे फॅटी ऍसिड 
खाद्यतेलाचे तज्ज्ञ डॉ. क्षितिज भारद्वाज म्हणाले, की आज तेल कंपन्यांकडून पुरविले जाणारे तेल हे तेल नसून फॅटी ऍसिडसारखे विष आहे. ग्राहक ते विकत घेऊन स्वतःवर विषप्रयोग करताहेत. पूर्वी डालडा व पामतेल वापरले जायचे. या दोन्हींचा स्मोक पॉइंट उच्च असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

मात्र, त्याबद्दल संभ्रम निर्माण करून बाजारातून हद्दपार करण्यात आल्या. आजघडीला जे घाण्याचे तेल वापरले जाते त्याची वापरण्याची पद्धती अत्यंत चुकीची आहे. एकदा गरम झालेले तेल पुन्हा वापरू नये. एकदा गरम करून वापरलेले तेल रिफाइंड तेलापेक्षाही अधिक घातक ठरते. त्याचबरोबर ज्या तेलामध्ये ओमेगाचे प्रमाण योग्य असते असे तेल सर्वोत्तम असल्याचे मत डॉ. भारद्वाज यांनी मांडले.