esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

उदयनराजेंनी राऊतांच्या प्रश्‍नांचे उत्तर द्यावे - नवाब मलिक 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गादीचे वारसदार आहेत. तसे रक्‍ताचे देखिल आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते संजय राऊत जर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुराव्याबद्दल प्रश्‍न उपस्थित करत असतील तर त्याचे उत्तर उदयनराजेंनी द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी येथे व्यक्‍त केले. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या श्री. मलिक यांनी सुभेदारी शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता.16) पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकासह उदयनराजे व श्री. राऊत यांच्यात सुरू असलेल्या शाब्दीक युद्धाबद्दल छेडले असता ते म्हणाले, गादीचे वारस आणि रक्‍ताचे नाते वेगळे असते. कोण दत्तक आणि कोण रक्‍ताचे आहेत, हे मला माहिती नाही. पण देशात बरेच जण गादीचे वारसदार आहेत. तसी प्रथाही आहे.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

दरम्यान, श्री. राऊत हे पुरावे मागत आहेत. त्यांच्या प्रश्‍नांचे उदयनराजेंनी उत्तर द्यावे, असा टोला श्री. मलिक यांनी लगावला. उदयनराजेंना वाटायचे त्यांच्यामुळे सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी निवडून येते. मात्र, तसे नाही. हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. भाजपवाले त्यांना मंत्री करणार होते. परंतू ते निवडूनच आले नाहीत. म्हणून मंत्री होत नाहीत. आता पुस्तकावरून वाद सुरु झाल्यानंतर विरोध करण्याऐवजी ते पाठराखन करीत आहेत. त्यांना काहीतरी मिळेल, असे वाटत असेल त्यामुळेच ते भाजपची देखील पाठराखण करीत असल्याची टिका यावेळी त्यांनी केली. 

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

राज्यात "त्या' पुस्तकावर बंदी घालू 
छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणासोबतच तुलना होऊ शकत नाही. तसा प्रकार कुणी करण्याचा प्रयत्नही करू नये, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे ज्या ठिकाणी प्रकाशन झाले. त्याच ठिकाणी लेखक जय प्रकाश गोयल यांनी पुस्तक मागे घेत असल्याचे सांगून जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्री. मलिक यांनी केली. तसेच सदरील पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घातली जाईल, असेही स्पष्ट केले. 

go to top