तोंडाला मास्क बाधून महावितरणची वसुली मोहीम 

photo
photo

औरंगाबाद : औरंगाबाद शहर मंडलात वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे महावितरणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, थकबाकीदाराकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तोंडाला मास्क बांधून वसूली मोहीम सुरू केली आहे. शहरात सोमवारी (ता. १६) ५३९ वीज ग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला; तर ४१ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

विभाग क्र. १ 

शहर मंडलातील दोन्ही विभागात सोमवारी थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहर विभाग क्रमांक एकमध्ये २४८ वीज ग्राहकांनी १२ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी भरली. १९२ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यांच्याकडे थकबाकीची रक्कम २४ लाख ३१ हजार रुपये आहे. तर १७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे थकबाकी पोटी दोन लाख ८१ हजार थकबाकी आहे. 

विभाग क्र. 2 

शहर विभाग क्रमांक दोनमध्ये ७१८ वीज ग्राहकांनी ३४ लाख ९० हजार रुपये भरले, त्यांच्याकडे २६ लाख १० हजार रुपयाची थकबाकी आहे. २६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पाच लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे, असे दोन्ही विभाग मिळून औरंगाबाद मंडलात ९६२ ग्राहकांनी ४७ लाख २१ हजार रुपये भरले आहे. ५३९ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ५१ लाख ४१ हजार रुपये थकबाकी आहे. ४१ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला असून, त्यांच्याकडे आठ लाख ३४ हजार रुपये थकबाकी आहे. 

धडक मोहिम सुरुच

थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in  ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर थकबकी भरावी असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com