कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पुणे-नाशिक मार्गावरील शिवशाही-शिवनेरी बंद 

अनिल जमधडे
बुधवार, 18 मार्च 2020

औरंगाबाद : कोरोना विषाणुचा झपाट्याने प्रसार होत असल्याने त्याचा सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. खबरदारीचा भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाने ज्या शहरात कोरोना विषाणुचे रूग्ण आढळून येत आहे, अशा मार्गावरील बस गाडया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे आणि नाशिक मार्गावर धावणाऱ्या शिवशाही आणि शिवनेरीच्या आठ बसगाड्या मंगळवारी (ता. १७) बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!

औरंगाबाद शहरातील अनेक चाकरमान्यांसह मोठया प्रमाणात विद्यार्थीवर्ग उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात जा ये करीत करीत असतात. तर पुणे शहरात कोरोना विषाणुने ग्रस्त असलेले काही रूग्ण आढळून आल्यामुळे पुणे शहरात जाणाऱ्या आणि येणाऱ्याची संख्या कमी झाली आहे. तसेच नाशिक शहरातही हिच परिस्थिती दिसून येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज पुण्यासाठी धावणाऱ्या सहा शिवशाही आणि शिवनेरी बसेस मंगळवारी बंद ठेवल्या होत्या. त्याच बरोबर नाशिक मार्गावर धावणाऱ्या दोन शिवशाहीही बंद करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - त्याने चक्क नाकारली नासाची ऑफर, आता सोशल मीडियावर त्याचीच धूम 

प्रवाशांना मास्क 
बांधण्याच्या सूचना 

कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात मोठया प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक बस गाडीला प्लॅटफार्मवर लागण्या आगोदर ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली जात आहे. बसमध्ये चढण्या आगोदर तिकीट खिडकीवरच प्रवाशांच्या हातावर सॅनिटायझर टाकून हात स्वच्छ केल्यानंतर त्यांच्या हातात तिकीट दिले जात आहे. शिवाय बसमध्ये आसनस्थ झालेल्या प्रवाशांना सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क बांधण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Shivshai Bus Aurangabad