शाळांचे वेळापत्रक कसे कोलमडणार? वाचा... 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये परीक्षा घेऊन त्यानंतर तातडीने निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांना धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांचा पेच निर्माण झाला आहे. परिमाणी, शाळांचे वार्षिक नियोजन कोलमडणार आहे.
 
शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात शाळेत सर्व इयत्तांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून लेखी परीक्षा घेण्यात येतात. शाळांच्या परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपतात; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत. 

त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तोंडीपरीक्षा घेतल्या जातील. नंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापर्यत परीक्षा घेण्यात येतील. म्हणजे पूर्ण एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांसाठी व्यस्त असणार आहे. याचा परिणाम शाळेच्या पुढील वेळापत्रकावर पडणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उन्हाळ्याची सुटी किमान एक ते दोन आठवडे पुढे जाणार आहे. त्यामुळे सर्वांनीच आधी केलेले नियोदन रद्द करून नवीन नियोजन आखावे लागणार आहे. 


अद्याप आभ्यासक्रम बाकी 
कोरोनाची खबरदारी म्हणून शाळांना सुटी आहे; परंतु इयत्ता पहिली ते नववीचा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवणे बाकी आहे. ३१ मार्चपर्यंत सुटी असल्यामुळे पहिल्या आठवड्यात तोंडी परीक्षा घ्यायच्या की राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. त्यानंतर लगेच द्वितीय सत्र परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टी पंधरा दिवसांत संपतील का? यासाठी शिक्षक, शाळांना मात्र बरीच कसरत करावी लागणार आहे. यामुळे शाळांनाही उशिरा सुट्या लागू शकतात; मात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुटीबाबत स्पष्ट निर्देश नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान  

ऐन उन्हाळ्यात घेणार का परीक्षा? 
एप्रिलचा पहिला आठवडा आभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, दुसरा आठवडा तोंडी परीक्षा घेण्यासाठी तर तिसरा व चौथा आठवडा द्वितीय सत्र परीक्षा घेण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे पूर्ण एप्रिल महिनाच शालेय आभ्यासक्रम व परीक्षेतच जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा पत्र्याच्या आहेत. ऐन उन्हाळ्यात मुलांना पत्र्याच्या खोलीमध्ये बसून पेपर सोडावे लागणार आहेत; तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई असते अशा परीस्थितीत शाळांना पाण्याचा प्रश्‍नही सतावणार आहे. 

आश्चर्य वाचा -  आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार  

निकालावर होऊ शकतो परिणाम 
दहावी, बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम चालू आहे. त्यासाठी शिक्षकांना शाळेत यावे-जावे लागते. यासाठी शिक्षकांना घराबाहेर पडून वेग-वेगळ्या साधनांतून प्रवास करावा लागतो. तसेच शाळेत सर्वांना एकत्रच बसून उत्तरपत्रिका तपासणी करावयाचे काम करावे लागणार आहे. यामुळे शासनाचा उद्देश सफल होणार नाही. शिक्षकांनाही कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये, अशा सूचना असल्यामुळे दहावी, बारावीच्या निकालावरही याचा परिणाम होऊ शकतो. 

हे ही वाचा...   अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका!  

परीक्षेनंतर शिक्षकांना जनगणनेची कामे 
पंधरा दिवसांच्या विलंबनाचा थेट परिणाम शिक्षकांच्या कामकाजावर होणार आहे; कारण एप्रिल महिना संपताच शिक्षकांना निवडणूक व जनगणननेची कामे असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर कधी तपासणार? निकालपत्रक कधी तयार करणार? जनगणननेची कामे कधी करणार? असे एक ना विविध प्रश्‍न शिक्षकांसमोर आसणार आहेत. 
-- 


कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत नाही तोपर्यंत परीक्षा असो की सुटी; कोणत्याही विषयाबाबत ठोस निर्णय घेणे शाळा व्यवस्थापनाला शक्‍य नाही. त्यामुळे वाट पाहण्याशिवाय आमच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नाही. यामुळे शाळा, शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. 
- वाल्मीक सुरासे, संस्था चालक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com