लाईट जाताच येथे साधा बिनधास्त संपर्क 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 3 June 2020

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण तत्पर, 
वीज पुरवठा खंडीत होतोच करता येते तक्रार 

औरंगाबाद : कोरोनाचे संकट आणि पावसाळ्याच्या अनुशंगाने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे हजारो अधिकारी, अभियंते व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. वीज पुरवठा जावुच नये असे धोरण आहे. मात्र तरीही विविध कारणांनी विद्युत पुरवठा खंडीत झालाच तर थेट संपर्क साधुन नागरीकांना माहिती घेता येणार आहे. 

लॉकडाऊन सुरू असतानाच आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच नागरिक घरी असल्याने टीव्हीसह विविध विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यातच पावसाळ्यामुळे विविध कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी धाव घेऊन तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतात. लाईट जाताच महावितरणचे कर्मचारी कामाला लागलेले असतात मात्र हे सामान्य नागरीकाला माहित नसल्यानेच त्यांची तगमग सुरु होते. अनेक वेळा महावितरणला वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती नसते अशा वेळी लाईट केव्हा येणार असा प्रश्न प्रत्येकाचा असतो. त्यासाठीच नागरीकांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तक्रारीसाठी केवळ मिसकॉल द्या 

औरंगाबाद शहरातील नागरीकांनी आता ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस कॉल दिल्यास किंवा NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठविल्यास खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या क्रमांकावर साधा संपर्क 

महावितरणचे मोबाईल ॲप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ हे टोल-फ्री क्रमांक तसेच स्थानिक नियंत्रण कक्षाच्या ७०६६०४२४१०, ७०६६०४२४१२ (औरंगाबाद शहर), ७८७५७५६६५२ (औरंगाबाद ग्रामीण), ७८७५७६४१४४ (जालना मंडल) या क्रमांकांवर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदवता येईल. यासाठी मात्र महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्यातील ग्राहकांसाठी 

लातूर नियंत्रण कक्ष ७८७५७६२०२१, बीड नियंत्रण कक्ष ७८७५१७६४६४, उस्मानाबाद नियंत्रण कक्ष ७८७५२११६१५. नांदेड नियंत्रण कक्ष ०२४६२२८६९०५, ७८७५४७३९८०, परभणी नियंत्रण कक्ष ७८७५४७६३२६, हिंगोली नियंत्रण कक्ष ७८७५४४७१४३ याच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Mahavitran Aurangabad