त्याने चक्क नाकारली नाासाची ऑफर, आता सोशल मीडियावर त्याचीच धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopal G news

बिहार राज्यातील तो रहिवासी. बुद्धीने इतका तल्लख की त्याच्या बुद्धीची कमाल पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी नासामध्ये त्याला ऑफर दिली . मात्र मी भारत देशासाठी संशोधन करेन म्हणत त्याने नासाची ऑफर नाकारली आहे. गोपाल जी  असं त्या तरुणाचं नाव आहे.

त्याने चक्क नाकारली नाासाची ऑफर, आता सोशल मीडियावर त्याचीच धूम

औरंगाबाद : सध्याच्या काळात जर कोणाला नासाने ऑफर दिली तर वेडा माणूस असेल जो ती नाकारेल.....पण होय बिहार राज्यातील एका मुलाने चक्क नासाने दिलेली आफर नाकारली आहे. चक्क एक नाही तर तीन वेळा त्याने नासाची आफर नाकारली आहे. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्या उत्सूकतेपोटी नेटीझन्स त्या तरुणाबद्दल माहिती घेत आहेत.

हेही वाचा-  (व्हिडिओ पाहा) राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना मी ज्ञान पाजळू शकत नाही, कारण....

बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील रहीवासी असलेल्या या तरुणाचे नाव आहे गोपाल जी. तो केवळ 19 वर्षे वयाचा आहे. सोशल मिडीयावरील मंगेश अशोक देशपांडे या युवकाने गोपालबद्दल काही माहिती पोस्ट केली आहे. श्री. देशपांडे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गोपालला नासासोबत काम करण्याची ऑफर दिली होती त्यावर याने " मी भारतात राहूनच देशासाठी संशोधन करेन" असे म्हणत ती ऑफर स्विकारली नव्हती. श्री. देशपांडे म्हणतात, अशी मुले खरोखरच देशासाठी एक मोठी असेट असतात.. ह्या अशा असेट्स वाढल्या पाहिजेत.

दरवर्षी 100 मुलांना करणार मदत
गोपाल याने दरवर्षी 100 मुलांना मदत करण्याचे ठरवले आहे. यातून त्याने 8 मुलांसाठी प्रोव्हिजनल पेटेंट घेतले आहे. गोपाल सध्या डेहराडून येथील ग्राफीक एरा (Graphic Era Institute Dehradun) या सरकारी संस्थेत प्रयोग करत आहे. झारखंड येथे स्वतःची एक प्रयोगशाळा काढून तेथे काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

क्लिक करा-(व्हिडिओ पाहा) भाषण संपविण्याची चिठ्ठी येताच, तुमच्या संमेलनाची शोभा वाढवायला आलो नाही म्हणत साहित्यिक डाॅ. अक्षयकुमार काळे संतापले 

6 हजार वैज्ञानिकात प्रमुख वक्ता असणार
प्रामुख्याने दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या एप्रिल महिन्यात अबुधाबी येते जगातील सर्वात मोठा सायन्स फेयर पार पडत आहे. यात जगभरातून तब्बल 6 हजार वैज्ञानिक सहभागी होणार असून, तिथे "गोपाल जी" हा फेयरमध्ये प्रमुख वक्ता असणार आहे.

जगभरातील पहिल्या 30 वैज्ञानिकात समावेश

गोपाल याने तुलसीपूर येथील मॉडेल हायस्कूलमधून इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2013-14 सालात त्याने बनवलेल्या बायो सेल निर्मितीसाठी त्याला इन्स्पायर्ड अवॉर्ड देऊन सन्मानितही करण्यात आले. तेव्हा तो इयत्ता 10 वीत शिकत होता. अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या या मुलाने अनेक स्कॉलरशिप मिळवत आपले शिक्षण पुर्ण केले आहे. गोपालने आत्तापर्यंत प्रयोग करुन 6 शोध लावले आहेत. त्यामुळेच त्याचे नाव जगभरातील पहिल्या 30 स्टार्टअप वैज्ञानिकांमध्ये घेतले जाते.


ही आहेत गोपालची प्रमुख संशोधनं..
●Banana Bio cell(Patent #: 16/676,566)
●Paper Bio Cell (Patent #: 17/678,467)
●Goponium Alloy(Work in Progress)
●G-Star Powder (Work in Progress)
●Hydroelectric Bio Cell (Work in Progress)
●Solar Mile(Work in Progress)
● Gopa-alaska(Work in Progress)
● BNC & BNF ( Work in Progress)
● Pseudo Plastic(Work in Progress)

क्लिक करा- दुसऱ्यांपुढे हात पसरण्यात हरवतेय बालपण

गोपालला मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान..
● Inspire Award (Govt. of INDIA ) 2016
● National Innovation Award (MHRD , Gov. of INDIA ) 2018
● Bihar Gaurav Samman (Voice of Bihar) 2018
● Best Innovative Brain of Bihar (Govt. of Bihar) 2017
● Genius Award ( DANIK GAJRAN ) 2017
● Rastriya Pratibha Samman ( Gov. of INDIA ) 2017
● Pride of Bhagalpur (District Admin.) 2017, 2018
● Publication of Research Papers in around 30 countries ( e.g.:- USA ,ITALY, JAPAN,OMAN,JERMANY ,etc…)
● Top 3 World Changing Invention for Environmental Protection (Banca Interprovincial, Italy)
● Acceptance Letters from Stanford University, Oxford University, Japan University and NJIT, America
● Global Leader Award 2018 (SDGMUN, India )
● International Brand Ambassador of Bodhi Tree Foundation , India
●Country representative of HRO (Human Right Organization)
●Founder of YMRD (Young Mind Research And Development)
● Brand Ambassador Of NavJeevan Jyoti Sansthan,New Delhi
●Brand Ambassador of St. Xavier School ,INDIA
●Mentor And Judge Of VSSUT Innobuzz,2019
●Mentor And Judge Of Innovation Festival ,2019
●Judge of Smart India Hackathon (Gov. of India ) 2019
●Judge of Jawahar Lal Nehru Science Congress (Gov. of India ) 2018-19(National Level)

हे वाचलंत का?- राज्य महार्गावर दरोडेखोर - पोलिसांत चकमक, हवेत गोळीबार : पोलिस निरीक्षक जखमी

Web Title: Young Man Who Rejected Nasa Offer Donald Trump Has Gone Viral Grounds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top