esakal | दोन दिवसांत गारपिटीची शक्यता; बुरवी चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात तुरळक सरी
sakal

बोलून बातमी शोधा

4Hailstorm_9

अरबी समुद्रात आलेल्या बुरवी चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१३) शहरातील काही भागांत हलका पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे गेल्या ४८ तासांपासून शहरात सूर्यदर्शन झाले नाही.

दोन दिवसांत गारपिटीची शक्यता; बुरवी चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात तुरळक सरी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : अरबी समुद्रात आलेल्या बुरवी चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१३) शहरातील काही भागांत हलका पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे गेल्या ४८ तासांपासून शहरात सूर्यदर्शन झाले नाही. पुढील ४८ तासांपर्यंत गारासह पावसाची शक्यता असल्याचे एमजीएम एपीजे ऑस्ट्रोस्पेस सायन्स सेंटरचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. या चक्रीवादळामुळे आपल्याकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला.

त्यामुळे शहरात काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाला. यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भ, कोकणातील काही भागासह गुजरात, मध्य प्रदेशात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाची भूर-भूर दिसून आली. मात्र, अजून पुढील ४८ तास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. यासह उत्तरेकडील थंड वारे आपल्याकडे आल्यामुळे काही ठिकणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचे औंधकर म्हणाले.


गुरुवारनंतर वाढणार थंडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ.मदन सूर्यवंशी म्हणाले, की कोणतेही वादळ हे साधारणतः तीन दिवस असते. वादळामुळे कमी दाब निर्माण झाला. यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाली. त्यामुळे शहरात अनेक ठिकणी हलका स्वरूपाचा पाऊस झाला. आपला भागातील भूपृष्ठ दिवसा तापते, रात्री थंड होतो. प्रसरण व आकुंचनच अशा दोन्ही क्रिया चालू असतात. मधेच ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पाऊस पडतो. हे प्रमाण अत्यल्प असते. प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसाला अशा स्वरूपाची कमी जास्त प्रमाणात वातावरण होत असते. आता अशीच परिस्थिती आहे. यामुळे वादळी वारे आहेत. १७ डिसेंबरनंतर हे वारे कमी झाल्यावर थंडीला सुरवात होईल. हा वादळाचा झोत आता ओसरत जाईल, असेही डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर