या ग्रामपंचायतीने बाहेरच्या व्यक्तीला गावात येऊ न देण्याचा घेतला ठराव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

शहरात तसेच सातारा, देवळाई भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने गावाच्या सीमा तीनही बाजूंनी बंद करण्यात आल्या आहेत. गावाच्या सीमेवर ग्रामसुरक्षा दल तैनात केले असून आता बाहेरच्या गावातून येणाऱ्या व्यक्तीला प्रवेश बंदीचा ठरावच ग्रामपंचायतने घेतला आहे.

औरंगाबाद : शहरात तसेच सातारा, देवळाई भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने गावाच्या सीमा तीनही बाजूंनी बंद करण्यात आल्या आहेत. गावाच्या सीमेवर ग्रामसुरक्षा दल तैनात केले असून आता बाहेरच्या गावातून येणाऱ्या व्यक्तीला प्रवेश बंदीचा ठरावच ग्रामपंचायतने घेतला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

बाळापूर येथील चेकपोस्टवर बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी केली आहे. गावात दवंडी देऊन पाहुण्यांना आपल्या घरात न घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे आढळून आले तर कायदेशीर कारवाईचा इशाराही ग्रामपंचायतने दिला आहे. दुध विक्री किंवा अत्यावश्यक कामासाठी कुणी बाहेर गेल्यास चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या वाहनावर सॅनिटाईझर फवारणी करून वहात सॅनिटायझरने स्वच्छ केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे.

ग्रामपंचायततर्फे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. आता गावाच्या सुरक्षेची आणि नियंत्रनाची जवाबदारी ग्राम सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. कुणी नियमांचा भंग केल्यास अथवा अरेरावी केल्यास सुरक्षा दल समितीच्या सदर बाब निदर्शनास आणून देण्यात येते. यानंतर समिती नियम तोडणाऱ्याला समज देते. तरीही कुणी जुमानले नाहीच तर नियमांचा भंग झाल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत कळविण्यात येणार आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक  महेश आंधळे  यांच्या उपस्थितीत बाळापुरात चेकपोस्ट सुरू करण्यात आला आहे. वेळी ग्रामसेवक डी. पी. शिंदे, रामराव खाडे, सुभाष पवार, मुरलीधर खाडे, वैजिनाथ वाघ, गणेश वाघ, विठ्ठल खाडे, भानुदास खाडे, सुरेश औताडे तसेच पोलीस कर्मचारी सोपान डकले ग्राम सुरक्षा दलाचे तरूण यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Any One Can Enter Wihout Villagers Permission Aurangabad News