भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांच्या चाचण्यांचे काय? कृषी विभाग अजूनही झोपेतच

सुषेन जाधव
Thursday, 23 July 2020

औरंगाबादेत लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी शहरवासीयांना माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध केला. शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेत तिसरा मध्यस्थी नसल्याने शेतकऱ्यांच्याही खिशात दोन पैसे मिळाले, तर ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळाला; मात्र त्यांच्या जिवाची काळजी कृषी विभागाला मात्र करावीशी वाटली नाही.

औरंगाबाद: लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी शहरवासीयांना माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध केला. शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेत तिसरा मध्यस्थी नसल्याने शेतकऱ्यांच्याही खिशात दोन पैसे मिळाले, तर ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळाला; मात्र त्यांच्या जिवाची काळजी कृषी विभागाला मात्र करावीशी वाटली नाही.

हेही वाचा- उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची अवमान नोटीस, पण कशामुळे?  

एकीकडे विक्रेत्यांना अँटीजेन टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र घेण्यास महापालिकेने भाग पाडले; मात्र लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ‘शेतकरी गट’ उभा करणाऱ्या कृषी विभागाला शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे नसल्याचे यातून समोर आले आहे. 

महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी शहरात विक्रेते, व्यापाऱ्यांना अँटीजेन टेस्ट सक्तीची केली, त्याशिवाय विक्री केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे फर्मान काढले होते. त्यानंतर आज चार दिवसांपासून रोज व्यापाऱ्यांची संबंधित टेस्टसाठी गर्दी होत आहे. असे असूनही तब्बल तीन दिवसांनंतरही कोरोना तपासणीचे अहवाल आलेले नाहीत. या सगळ्या प्रक्रियेत मात्र ग्रामीण भागातून येणारा शेतकरी वंचितच राहिला आहे. 

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश  

....तर पूर्ण गावच होईल कोरोनाग्रस्त 
सध्या शहरात भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या एकाही शेतकऱ्याची अँटीजेन टेस्ट न केल्याचा प्रकार समोर आला आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर शहरात बाधा झाली तर पूर्ण गावाला कोरोना विळखा बसेल, याची कोणालाच जाणीव नसल्याची खंत शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

रोज शहरात भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अँटीजेन तपासणीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात 

गावकऱ्यांचा विरोध पत्करून भाजीपाला शहरात विकायला येत होतो, जीव धोक्यात घालूनही आमच्या जिवाची काळजी कोणीच करीत नसेल तर आता आम्हालाही विचार करावा लागेल. कृषी विभागाने नव्या नवरीसारखं सुरवातीला विचारपूस केली; पण आता कोणी आला-गेला, कशाचंच काही नाही. 
- भाजीपाला विक्रेता शेतकरी. 

आम्ही शेतकऱ्यांना केवळ सोसायटीचे ग्राहक जोडून दिले आहेत. अँटीजेन त्यांनी स्वतःच करून घ्यायची आहे. तसे शेतकऱ्यांना सांगतलेही आहे. शेतकरी स्वतःच स्वतःची काळजी घेत आहेत. 
- अनिलकुमार हदगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No CoronaVirus Test For Vegetable Suppliers Farmers Aurangabad Agricultural News