esakal | पीककर्जासाठी दाद कुणाकडे मागायची?  
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan.jpg

बॅंका म्हणतात- उद्दिष्टाची पूर्तता, प्रशासन म्हणते- अर्ज करा 

पीककर्जासाठी दाद कुणाकडे मागायची?  

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : पीककर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, बँका पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश गित्ते यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


त्यांनी पत्रकात म्हटले, जिल्ह्यातील खरीप पीककर्जासाठी व ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीककर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे;

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु बँकेकडे शेतकऱ्यांना कर्जासाठी अर्ज केले असता बँकेचे अधिकारी म्हणतात, आमच्या बँकेचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असे सांगून शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित ठेवण्याचा घाट मांडला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यात यंदा हातात आलेले पीक परतीच्या पावसाने जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत खरिपाचे पीककर्ज न दिल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. 

(संपादन-प्रताप अवचार)