esakal | फळपिक विमा नुकसान भरपाई मिळेना, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Central Team Visits Heavy Rain In Shekta Aurangabad

पैठण तालुक्यातील सर्व महसूल मंडळात आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मोसंबी व डाळिंब फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.

फळपिक विमा नुकसान भरपाई मिळेना, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे तक्रार

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील सर्व महसूल मंडळात आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मोसंबी व डाळिंब फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई तापमान वाढ, हवामानात बदल होऊनही हवामानावर आधारित प्रधानमंत्री फळपिक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही अशी व्यथा केंद्रीय पाहणी पथकाकडे शेकटा (ता.पैठण) येथे शेतकऱ्यांनी मांडली आहे.


सोमवार (ता.२१) केंद्रीय पथकाचे प्रमुख राष्ट्रीय आपत्ती सहसचिव रमेशकुमार गंता, अर्थ नियोजन सल्लागार आर.बी.कौल यांनी पैठण तालुक्यातील डीएमआयसी महामार्गावरील गाजीपूर, निलजगाव येथे कापूस तर शेकटा येथील नारायण भवर या शेतकऱ्यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील मोसंबी फळबागेची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी नारायण भवर, डाळिंब उत्पादन कडुबाळ गटकळ यांनी संवाद साधताना अतिपावसाने मृग,अंबिया बहार फळाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगून पुन्हा नव्याने बहार धरण्यासाठी बागाची मेहनत, पाणी खते व बुरशी,डिंक्या रोगांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. यासाठी पैशाची गरज आहे.

दुसरीकडे गत वर्षीही बागाचे हवामान बदल, तापमान वाढीने नुकसान होऊनही त्याचा फळपिक वीमा कंपनीने दिला नाही तो मिळावा अशी मागणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपायुक्त पराग सोमण, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.तुकाराम मोटे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, मंडळ अधिकारी शैलेश जोशी, रामनाथ कारले, पर्यवेक्षिका वैशाली कांबळे, कृषी सहायक एस.एन.बादलवाड, तलाठी जितेंद्र राठोड, पंचायत समिती सभापती आशोक भवर, माजी सभापती अप्पासाहेब खंडागळे, सरपंच एकनाथ भवर, विष्णू भवर, शेतकरी काकासाहेब जगताप, शरद भवर, नारायण भवर, एकनाथ कंठे, बद्रीनाथ गटकळ आदी शेतकरी उपस्थित होते.
 

संपादन - गणेश पिटेकर