..तर आरोग्य कर्मचारी ही असुरक्षित

शेखलाल शेख
शुक्रवार, 27 मार्च 2020

पीपीटी किट मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात, रोटेशन प्रमाणे सर्व अधिपारिचारिकांचे आयसोलेशन वॉर्डात ड्युटी लावावी, सॅनिटायझर, हँण्ड वॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे, चेंजिंग रुम विथ वॉश रुम असी व्यवस्था असलेले कक्ष उपलब्ध करावे, सर्व प्रतिनियुक्ती अधिपरिचारी व परिसेविका यांना जिल्हा रुग्णालयात बोलावून घेण्यात यावे मागण्यात करण्यात आल्या आहे.

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोरोना संशयित तसेच रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असल्याने येथील परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी भयभीत असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा किट, सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. 

पीपीटी किट मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात, रोटेशन प्रमाणे सर्व अधिपारिचारिकांचे आयसोलेशन वॉर्डात ड्युटी लावावी, सॅनिटायझर, हँण्ड वॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे, चेंजिंग रुम विथ वॉश रुम असी व्यवस्था असलेले कक्ष उपलब्ध करावे, सर्व प्रतिनियुक्ती अधिपरिचारी व परिसेविका यांना जिल्हा रुग्णालयात बोलावून घेण्यात यावे मागण्यात करण्यात आल्या आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतले की कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तर काही मागण्यांची पुर्तता त्वरीत करण्यात येतील. 

हेही वाचा- अतिउत्साहींचा त्रास अद्याप कायम

निवेदनात म्हटले की, सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू आहेत. त्यात संपुर्ण जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. अशावेळी येथील कर्मचारी जिवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. तर योग्य प्रकारच्या सुविधा जर कर्मचाऱ्यांना त्वरीत मिळाल्या नाही, तर येथील कर्मचाऱ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी येथील कार्यरत पारिचारिका व चतुर्थश्रेणीत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी सुक्षेच्या दृष्टीकोनातून सेवा द्यावी, निवेदन देताना कुसुम भालेराव, जना मुंढे, आशा शिरसाट, अनु सावरगाव, सागर दवणे, सुनीता ढेपले, किरण निर्मळ आदींची उपस्थिती होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurses Health Worker Demand Safety Kit And Equipment Aurangabad