शहर कडकडीत बंद : उपद्रवींचा त्रास कायमच

अनिल जमधडे
Friday, 27 March 2020

जीवनावश्यक वस्तू मिळत असल्याने दिलासा 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. असे असले तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. तथापि, अंशत: मिळणाऱ्या सुटीचा काहीजण गैरफायदा घेत असल्याने त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. मात्र त्यामुळे गरजूंनाही बाहेर पडताना पोलिसांचा सामना करावा लागत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरात चौकाचौकात पोलिसांची गस्त सुरू आहे. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना पोलिस ‘प्रसाद’ही देत आहेत, जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर जाता येते; परंतु पोलिसांचा दणका केव्हा बसेल ते सांगता येत नाही. काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडून गर्दी करतात. त्यामुळेच आवश्यक वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, चौकाचौकात गस्तीवर असलेल्या पोलिसांसाठी अनेक जण चहा, कॉफी, थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन मदतीचा हात पुढे करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था, समाजसेवक यांनीही निराधार, निराश्रित, गोरगरिबांसाठी अन्नदानाची व्यवस्था सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रमोद राठोड मित्रमंडळ, राजेंद्र जंजाळ मित्रमंडळ, राजू बागडे मित्रमंडळ, आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे अन्नदान करण्यात येत आहे. याच काळात रक्तदानाचा रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक जण घाटी रुग्णालयात येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदानही करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad