esakal | महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

राज्यात उदभवलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वरील अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, तातडीची निकड व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन हे बदली/पदोन्नतीचे आदेश काढण्यात आल्याचे या बदली आदेशात म्हटले आहे. बदली/पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी रुजू व्हावे. शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्यात येऊ नये, असेही या बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे गुरुवारी (ता.30) अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अपर जिल्हाधिकारी श्री. पालवे यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर अनंत बाबुराव गव्हाणे यांची बदली करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकता म्हणून या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये औरंगाबाद महसूल विभागातील अनेकांचा समावेश आहे. बदली/ पदोन्नती आदेशानुसार वामन कदम यांची बदली आता (उपायुक्त पुरवठा) औरंगाबाद विभाग, पांडुरंग कुलकर्णी यांची बदली उपआयुक्त पुनर्वसन शाखा औरंगाबाद येथे करण्यात आली आहे.

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

अंकुश पिनाटे यांची बदली अपर जिल्हाधिकारी जालना येथे, राजेश काटकर अपर जिल्हाधिकारी परभणी येथे, तुषार ठोंबरे अपर जिल्हाधिकारी बीड येथे, अरविंद लोखंडे अपर जिल्हाधिकारी लातूर येथे बदली, शंकर बगे अपर जिल्हाधिकारी हिंगोली येथे तसेच मंजुषा मिसकर अपर जिल्हाधिकारी अंबेजोगाई येथे, मनीषा जायभाये उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा मुंबई, धनंजय सावळकर सह संचालक, पुनर्वसन संचलनालय मुंबई, चंद्रकांत थोरात यांची आरोग्य मंत्री यांचे खासगी सचिवपदी तर तरुणकुमार खत्री अल्पसंख्याक विकास मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी या पदावर आणि रविकांत कटकधोंड यांची बदली गृहनिर्माण मंत्री यांचे खासगी सचिव या पदावर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

राज्यात उदभवलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वरील अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, तातडीची निकड व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन हे बदली/पदोन्नतीचे आदेश काढण्यात आल्याचे या बदली आदेशात म्हटले आहे. बदली/पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी रुजू व्हावे. शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्यात येऊ नये, असेही या बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासनाचे उप सचिव डॉ.माधव वीर यांच्या स्वाक्षरीने हे बदली आदेश काढण्यात आले आहेत.

go to top