चार महिने नातेवाईकांकडे लपून बसला, अन आज अलगद जाळ्यात सापडला, त्यानेच दिलीय कबुली दिली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

चार महिन्यापूर्वीच्या गांजाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले. अनिल उर्फे नंदु शेषराव शेलार (रा.हुसेन कॉलनी) असे त्या संशयित आरोपीचे नाव असून पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला शहरातून ताब्यात घेतले. याच गुन्ह्यात यापूर्वी बबनराव उजीवाल (वय ६०) याला दौलताबाद पोलिसांनी अटक केली होती, तर त्याचा साथीदार पळून गेला होता. 

औरंगाबाद: चार महिन्यापूर्वीच्या गांजाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले. अनिल उर्फे नंदु शेषराव शेलार (रा.हुसेन कॉलनी) असे त्या संशयित आरोपीचे नाव असून पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला शहरातून ताब्यात घेतले. याच गुन्ह्यात यापूर्वी बबनराव उजीवाल (वय ६०) याला दौलताबाद पोलिसांनी अटक केली होती, तर त्याचा साथीदार पळून गेला होता. 

हेही वाचाः डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारो भाविकांची उपस्थिती

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार संशयित शेलार हा त्याच्या घरी आल्याची गुप्त माहिती माहिती मिळाल्यावरुन थेट घरुन शेलारला डीबी पथकाने बुधवारी (ता.२) दुपारी साडेतीन वाजेदरम्यान ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने १९ मार्च २०२० रोजी मी व माझा साथीदार बबनराव उजीवाल हे दोघे गांजा घेऊन दौलताबाद घाटातून दुचाकीवर येत असताना नाका बंदी करणाऱ्या पोलिसांनी आम्हाला थांबविले.

उजीवालकडे पोलिस चौकशी करत असतानाच मी गांजाची पिशवी तिथेच टाकून दुचाकीवर पळून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आजपर्यंत रेल्वेगेट क्र. ५६ मुकूंदवाडी परिसरात नातेवाईकांकडे लपून बसल्याचेही आरोपी शेलारने कबुली दिली. त्याच्याविरोधात आजवर अत्याचार, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला पुढील कारवाईसाठी दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही श्री. सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा-BreakingNews: मशीद उघडण्याआधीच इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रसाद, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ डॉ.राहुल खाडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घनश्याम सोनवणे स.पो.नि.पोस्टे पुंडलीकनगर, पोउपनि प्रभाकर सोनवणे, पोह रमेश सांगळे, पोना बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, प्रविण मुळे, राजेश यदमळ, रवि जाधव, दिपक जाधव, कल्याण निकम, जालिंदर मान्टे, यांनी केली.

संपादनः सुषेन जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Accused After Four Months In The Matter Of Cannabis Aurangabad News