esakal | BreakingNews: मशीद उघडण्याआधीच इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel

खासदार इम्तियाज जलील यांनी एक तारखेला मंदिर आणि दोन तारखेला मशिद उघडून सामुदायिक नमाज अदा करण्याची घोषणा केली होती. यानुसार ते बुधवारी (ता.२) शहागंज येथील मशिदीत नमाज अदा करणार होते. मात्र त्या अगोदरच कार्यालयापासून मशीदकडे निघालेल्या इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

BreakingNews: मशीद उघडण्याआधीच इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील यांनी एक तारखेला मंदिर आणि दोन तारखेला मशिद उघडून सामुदायिक नमाज अदा करण्याची घोषणा केली होती. यानुसार ते बुधवारी (ता.२) शहागंज येथील मशिदीत नमाज अदा करणार होते. मात्र त्या अगोदरच कार्यालयापासून मशीदकडे निघालेल्या इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हेही वाचाः डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारो भाविकांची उपस्थिती

जलील यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले होते. बुधवारी सकाळपासूनच शहागंज येथील मशिदीसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, मशिदी समोरील मुख्य रस्ता पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केला. त्यामुळे येथे कार्यकर्त्यांना येता आले नव्हते. दुपारी नेहमीप्रमाणे येथे दोन-तीन लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा झाल्याची सूचना असलेले बोर्ड बाहेर लावण्यात आले होते. बुढीलाईन येथील कार्यालयापासून इम्तियाज जलील पायी निघाले होते.

मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस आयुक्तालय येथे आणले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहिती होतात पोलीस आयुक्तालयात मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी सुद्धा खडकेश्वर परिसरातील महादेव मंदिर येथे शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे एमआयएम ला आंदोलन मागे घ्यावे लागले होते. बुधवारी सुद्धा इम्तियाज जलील यांना आंदोलन करता आले नाही.

क्लिक कराः स्वतःच्या विहीरीतील पाणी दिले, आता मोबादल्यासाठी शेतकऱ्यांची होतेय पायपीट 

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे मंगळवारचे आंदोलन मागे

खडकेश्वर मंदिर उघडण्यात यावे याबाबत एमआयएम पक्षाच्या वतीने मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मंगळवारी (ता.एक) दुपारी दोन वाजता खासदार इम्तियाज जलील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंदिरासमोर जमणार होते. मात्र याला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. हिंदूंचे मंदिर उघडण्यास हिंदू समर्थ आहेत, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. राज्यातील मंदिर-मशिद उघडण्यात यावे, अशी मागणी करीत एमआयएमने तीव्र आंदोलन हाती घेतले आहे.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी दोन वाजता एमआयएम पदाधिकारी खडकेश्वर येथे घटनास्थळी आले. मात्र, त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मंदिराच्या आवारात होते. त्यामुळे मंदिराच्या आवारात काही काळ गोंधळ तर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोरदार घोषणा बाजी सुरू झाली होती. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत एमआयएम कार्यकर्त्यांना निघून जाण्यास सांगितले होते. त्यामुळे आंदोलन करता आले नाही.

हे वाचलंत का?: काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन