esakal | त्यांनी अंगावर पेट्रोल ओतले आणि पसार झाले, मुख्य आरोपीस पकडले 
sakal

बोलून बातमी शोधा

accused News Aurangabad

प्लॉटच्या वादातून विश्रांतीनगर भागात शेषराव शेंगूळे या व्यवसायिकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पसार झालेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडादंधिकारी ए. जे. पाटील यांनी आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पप्पू मोहनराव सूर्यवंशी असे त्या संशयिताचे नाव आहे. 

त्यांनी अंगावर पेट्रोल ओतले आणि पसार झाले, मुख्य आरोपीस पकडले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : प्लॉटच्या वादातून विश्रांतीनगर भागात शेषराव शेंगूळे या व्यवसायिकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पसार झालेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडादंधिकारी ए. जे. पाटील यांनी आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पप्पू मोहनराव सूर्यवंशी असे त्या संशयिताचे नाव आहे. 

शेंगुळे प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी चिकलठाणा भागातील सुंदरवाडी येथे गट नंबर 39-2 मध्ये वीस बाय तीस आकाराचा प्लॉट राजनगर, मुकुंदवाडी येथील स्वाती गजानन जाधव यांना तीन लाख 22 हजारांत विक्री केला होता. व्यवहारावेळी प्लॉटची मालकी सातबाऱ्यावर नोंद करून देण्याचे ठरले होते; परंतु सातबाऱ्यावर नाव लागू होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. अनेकदा स्वाती व तिचा पती गजानन, स्वातीचा जालना येथील नातेवाईक पप्पू सूर्यवंशी यांच्यात खटके उडाले होते. गुरुवारी दीडच्या सुमारास तिघे शेंगुळे यांच्याकडे विश्रांतीनगर येथील कार्यालयात आले. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. तिघांनी प्लॉटचे पैसे दे; अन्यथा तुला जाळून मारू अशी धमकी दिली. त्यावर शेंगुळे यांनी आज एक लाख रुपये देतो, नंतर उर्वरित पैसे देतो, असे आश्‍वासन दिले; मात्र तिघांचे समाधान झाले नाही व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत ते पळून गेले. 

हेही वाचा- त्याने चक्क नाकारली नाासाची ऑफर, आता सोशल मीडियावर त्याचीच धूम

पोलिस कोठडीत रवानगी 

प्रकरणात स्वाती आणि तिचा पती गजाजन जाधव याला अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सुर्यवंशी याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला सोमवारपर्यंत (ता.3) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने वापरलेला चाकू, कपडे जप्त करणे बाकी असून पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली.

हे वाचलंत का?- 

हे वाचलंत काय़- आपल्या तहसीलदार मॅडम हिराॅईनसारख्याच दिसतात - बबनराव लोणीकरांचे आक्षेपार्ह वक्तव्य

go to top