esakal | शेळी आडवी आल्याने दुचाकीचा अपघात, एक जण गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाभरूळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) महामार्गाने दुचाकी सरळ जात असताना अचानक शेळी आडवी आल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

शेळी आडवी आल्याने दुचाकीचा अपघात, एक जण गंभीर जखमी

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाभरूळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) महामार्गाने दुचाकी सरळ जात असताना अचानक शेळी आडवी आल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता.१४) रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. मधुकर औचितराव पैठणे असे जोखमीचे नाव आहे. महामार्गावरील डाभरुळ शिवारात दुचाकीचा अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.


मधुकर पैठणे (वय ४२, रा.मुकुंदवाडी, औरंगाबाद) हे दुचाकीवरुन (एमएच २० ईडब्ल्यू ७२५२) पाचोडकडुन औरंगाबादकडे दुचाकी एकटेच जात होते. दुचाकी दाभरुळ शिवारात येताच एक बकरी त्यांच्या दुचाकीसमोर आडवी आली. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरली व ते खाली पडले. यात मधुकर पैठणे यांना जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच १०३३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ.विजय धारकर आणि रवी गाढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन  सदरील अपघातग्रस्त जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहे.

संपादन - गणेश पिटेकर