esakal | शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व, निबंध स्पर्धा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व, निबंध स्पर्धा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवार (ता.सात) रात्री सात वाजेपर्यंत निबंध पीडीएफ स्वरूपात व वक्तृत्वाचे व्हिडीओ रेकॉर्डींग मागवण्यात आले आहेत.  

स्पर्धेचे संयोजक जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे यांनी सांगीतले कि, वय १५ ते २५ वर्ष वयोगटात अ वर्गाची तर ब या खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. १५ ते २५ वर्ष वयोगटासाठी केंद्र सरकारचे २० लाख कोटी पैकेज - खरी वास्तविकता काय ? , मी शेतकरी बोलतोय आणि स्थलांतरित कामगार समस्या की समाधान ? हे तीन विषय आहेत. तर खुल्या गटासाठी आपली आरोग्य व्यवस्था , महाराष्ट्र आजचा अन उद्याचा आणि कोरोना योध्याच्या कुटुंबियांचे मनोगत हे स्पर्धेचे विषय आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

स्पर्धकांना आपले लेखणी व विचारांचे कौशल्य दाखवण्याची चांगली नामी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून चालून आलेली आहे या निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना तीन रोख पुरस्कार क्रमश: ३ हजार रूपये, २ हजार आणि १ हजार रुपये रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. निबंध स्पर्धेतील माहिती पर लेखातील सुचना प्रशासन यंत्राणांना पाठविल्या जातील तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशिस्ती पत्र देण्यात येणार आहेत. 

वक्तृत्वाचे सहा मिनीटाचे व्हिडीओ 

वत्कृत्व स्पर्धा वय १५ ते ३० वर्ष वयोगटासाठी होणार आहे. कोरोना योद्धा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोरोना नंतरचे जीवन आणि शेती हाच प्रगतीचा आधार हे या स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धकांनी या तीनपैकी एका विषयावर सहा मिनीटाचा व्हिडीओ रेकॉर्डींग करून तो व्हिडीओ आणि निबंध स्पर्धेतील स्पर्धकांनी पीडीएफ स्वरूपात निबंध नाव, पत्त्यासह प्र. संतोष बोर्डे यांच्या ९२२५७३२२४८ या व्हाट्स नंबरवर पाठवावा.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार रोख ११ हजार रूपये, द्वितीय पुरस्कार ७ हजार रूपये तर तृतीय पुरस्कार रोख ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धा पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे , राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार प्रदीप जैस्वाल , संजय शिरसाट, रमेश बोरणारे, उदयसिंह राजपूत , जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असल्याचे स्पर्धेचे संयोजक आमदार आंबादास दानवे यांनी सांगीतले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा