असं तुमच्यासोबतही घडु शकतं...गुगल पे वरून आधी पैसे पाठवून  मग हडपले एक लाख

मनोज साखरे
बुधवार, 4 मार्च 2020

औरंगाबाद येथील एका महिलेने क्लब फॅक्टरीच्या वेबसाईटवर पंजाबी ड्रेस ऑनलाईन खरेदी केला होता. तो पंजाबी ड्रेस परत करण्यासाठी महिलेने क्लब फॅक्टरीच्या वेबसाईटवर उपलब्ध मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. मात्र, तो संपर्क क्रमांक फसवा होता.

औरंगाबाद - वेबसाईटवर जाऊन पेमेंट ऑनलाइन करताय अथवा वस्तु रिटर्न करता आहात, मग ही माहिती तुम्ही वाचाच! त्याचे कारणही तसेच आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाईटवरुन खात्री न करता संपर्क क्रमांक मिळवून त्याद्वारे आपण पेमेंट केले तर ते पेमेंट भामट्याच्या खात्यात जाऊ शकते! असा प्रकार औरंगाबादेत एका महिलेसोबत घडला आहे. त्यांचे २४ ते २५ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ९९ हजार ९०० रुपये भामट्याने हडपले.

 त्याचे झाले असे, की औरंगाबाद येथील एका महिलेने क्लब फॅक्टरीच्या वेबसाईटवर पंजाबी ड्रेस ऑनलाईन खरेदी केला होता. तो पंजाबी ड्रेस परत करण्यासाठी महिलेने क्लब फॅक्टरीच्या वेबसाईटवर उपलब्ध मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. मात्र, तो संपर्क क्रमांक फसवा होता.

तो भामट्याने वेबसाईटवर स्वतःहून फीड केला होता. मात्र क्लब फॅक्टरी वेबसाईटचाच अधिकृत संपर्क क्रमांक समजून महिलेने समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्यानुसार कृती केली. त्याने महिलेला एक फसवी लिंक पाठवली आणि त्यामध्ये महिलेची गुगल पे व बॅंक खात्यासंदर्भात माहिती भरण्यास सांगितले.

 हेही वाचा- असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर... 

महिलेने विश्वास ठेवून पाठवलेल्या लिंकमध्ये माहिती फीड केली. त्यानंतर भामट्याला महिलेच्या गुगल पेचा अॅक्सिस मिळाला. 
या प्रकारात एक विशेष बाब घडली, ती म्हणजे विश्वास संपादनासाठी भामट्याने महिलेच्या गुगल पे अकाउंटवर तेराशे रुपयेही पाठवले. क्लब फॅक्टरीकडून पंजाबी ड्रेसपोटी पैसे मिळाले असे समजून भामट्याला महिलेने इत्यंभूत माहिती दिली.

 

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका  

त्यामुळे त्याचे काम सोपे झाले आणि मिळालेल्या ॲक्सेसद्वारे त्याने महिलेच्या खात्यातून ९९ हजार ९०० रुपये लंपास केले. ही बाब समजल्यानंतर मात्र महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणात अज्ञात भामट्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

बऱ्याचवेळा फसवणुक करणारे ई-कॉमर्स कंपन्यांच्या नावे स्वतःचे संपर्क क्रमांक इंटरनेटवर फिड करतात. ग्राहक विश्‍वास ठेऊन त्यावर कॉल करतात. त्यातून ग्राहकांची फसवणूक होते. आम्ही कंपनी व्यवस्थापनांना त्यांच्या वेबसाईटवर देण्यात येणाऱ्या संपर्क क्रमांकाची पडताळणी करण्याचे व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 
-कैलास देशमाने, पोलीस निरीक्षक.  सायबर पोलिस ठाणे​

 हेही वाचा- 

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा  

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Fraud Aurangabad Breaking News