तुम्ही एलआयसीत पॉलिसी काढलीय का... आधी हे वाचा..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

एलआयसी’चे लाईफ इंशुरन्स प्लॅन आणि रायडर्स विमा कंपनीच्या नव्या दिशा निर्देशकानुसार नाहीत, अशा पॉलीसींची संख्या २३ इतकी असल्याचे समजते. यात न्यु जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष असे काही ग्राहकांच्या आवडीचे प्लॅन्स देखील आहेत. हे काही प्लॅन्स नवीन निर्देशानुसार पुन्हा सुरु होणार आहेत.

नांदेड : भारतीय जीवन विमा निगम ही देशातील सर्वात विश्वासनीय विमा कंपनी ठरली आहे. साहजिकच करोडो भारतीयांचा विश्वास संपादन केलेल्या ‘एलआयसी’चे लाईफ इंशुरन्स प्लॅन आणि रायडर्स विमा कंपनीच्या नव्या दिशा निर्देशकानुसार नाहीत, अशा पॉलीसींची संख्या २३ इतकी असल्याचे समजते.

यात न्यु जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष असे काही ग्राहकांच्या आवडीचे प्लॅन्स देखील आहेत. हे काही प्लॅन्स नवीन निर्देशानुसार पुन्हा सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे ‘एलआयसी’ने मागील दोन ते पाच वर्षात बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा नव्याने सुरु करुन ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. 

यापूर्वी नव्हती ही अनुमती 

देशातली सर्वात मोठ्या एलआयसी विमा कंपनीत यापूर्वी बंद पडलेली पॉलिसी पुन्हा चालु करण्याची कुठलीच तरतूद नव्हती. परंतू, अनेक सामान्य ग्राहक विश्वासाने एलआयसीमध्ये पॉलिसी काढत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

त्यांच्याकडून मध्येच पॉलीसी बंद पडण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे अनेकांची रक्कम गुंतुन पडत होती. शिवाय एकदा बंद पडलेली पॉलीसी दोन ते पाच वर्षाने पुन्हा सुरु करण्याची कुठलीही तरतुद उपलब्ध नव्हती. आता मात्र एलआयसीच्या नवीन निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन वर्षाने पुन्हा पॉलीसी सुरु करता येऊ शकते. 

हेही वाचा - लाखमोलाचा साप, त्याच्या मागे लागली टोळी

३१ जानेवारीला बंद झाले हे प्लॅन  

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या दोन डझन पॉलीसी ३१ जानेवारीनंतर बंद करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिण्याच्या शेवटी भारतीय विमा नियमांक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) जीवन विमा कंपनीने इतर विमा पॉलिसी धारकांना बाजारातून पॉलीसी वापस घेण्यासाठी आदेश दिल्याचे सांगण्यात आल्याची माहिती असून, ज्या पॉलीसी नियमाला धरुन नव्हत्या त्या सर्व प्रोडक्टसना बाजारातून परत घेण्याकरता ३० नोव्हेंबर २०१९ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतू, जीवन विमा कंपनीने दोन महिण्याचा अवधी वाढवून घेतल्याचे समजते. 

हेही वाचाअनैतिक संबंध ठेवू देत नव्हता, झोपेच्या गोळ्या देऊन नवऱ्याला जाळून...

ह्या पॉलीसी नव्याने सुरु

भारतीय जीवन विमा निगमच्या वतीने काही पॉलीसी बंद करण्यात आल्या असल्या तरी यातील काही पॉलीसी ह्या इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत. त्या पॉलीसी आयआरबीकडून पुन्हा नव्या स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जाणार आहे. यामध्ये न्यू जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष अशा काही लोकप्रिय प्लॅनचा समावेश असल्याचे समजते. हे प्लॅन पुन्हा चालु करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत विचार केला जाणार आहे. 

फेब्रुवारीपासून हे प्लॅन बंदची शक्यता

एलआयसी जीवन तरुण, एलआयसी आधार शीला, एलआयसी भाग्यलक्ष्मी, एलआयसी आधारस्तंभ, एलआयसी जीवन शिरोमणी, एलआयसी मायक्रो बचत, एलआयसी अनमोल जीवन, एलआयसी न्यू मनी बँक, एलआयसी न्यू एंडोमेंट प्लॅन,  एलआयसी न्यू चिड्रन्स मनी बँक प्लॅन यासारखे जवळपास २३ प्लॅन बंद केले जाण्याची शक्यता आहे. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remember The Change In LIC Policy Nanded News