ऑनलाईन प्री-पीएच.डी कोर्सला एक जानेवारीपासून सुरवात

अतुल पाटील
Sunday, 27 December 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन प्री-पीएच. डी.’ कोर्स सुरु करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन प्री-पीएच. डी.’ कोर्स सुरु करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या कोर्ससाठी ४५ विषयातील तब्बल ७६० जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती कोर्स समन्वयक डॉ. भारती गवळी यांनी दिली. कला व सामाजिक शास्त्रे, विज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र तसेच आंतरविद्या या चार शाखेतंर्गत संशोधकासाठी एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान सदर कोर्स होणार आहे.

 

 

डॉ. एन. एन. बंदेला, डॉ. मोहम्मद अब्दुल राफे पुढाकार घेतील. झुम व गुगल अ‍ॅपच्या माध्यमातून सदर कोर्स ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. दररोज सकाळी १० ते साडेपाच दरम्यान ऑनलाईन कोर्स होईल. या कोर्समध्ये ४५ विषयातील संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन डॉ. गवळी यांनी केले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Pre Ph.d Course Open From First January Bamu Aurangabad News