esakal | धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस
sakal

बोलून बातमी शोधा

Covid After Infection

कोविडनंतर रुग्णांमध्ये शारीरिक गुंतागुंत (काॅप्लिकेनशन) होत असतानाच अँटिबाॅडीच (प्रतिजैविके) आढळलेल्या औरंगाबादेतील 38 वर्षीय महिलेच्या अर्ध्या अधिक शरीरात पू (पस) झाल्याची गंभीर बाब एमआरआय चाचणीनंतर स्पष्ट झाली.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद ः कोविडनंतर रुग्णांमध्ये शारीरिक गुंतागुंत (काॅप्लिकेनशन) होत असतानाच अँटिबाॅडीच (प्रतिजैविके) आढळलेल्या औरंगाबादेतील 38 वर्षीय महिलेच्या अर्ध्या अधिक शरीरात पू (पस) झाल्याची गंभीर बाब एमआरआय चाचणीनंतर स्पष्ट झाली. या महिलेवर डाॅ. हेडगेवार रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. जगातील वैद्यकीय नोंदीनुसार जर्मनीत अशा सहा केस आढळल्या होत्या. परंतु ही सर्वांत सिव्हियर केस असून भारतातील पहिलीच आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

याबाबत डाॅ.हेडगेवार रुग्णालयाचे स्पाईन सर्जन डाॅ.श्रीकांत दहिभाते यांनी सकाळला सांगितले, की औरंगाबादेतील 38 वर्षीय महिलेला दिवाळीनंतर आठ दिवसांनी कंबरदुखीचा त्रास जाणवत होता.त्यानंतर बाराव्या दिवशी तो प्रचंड वाढला. डाॅ. हेडगेवार रुग्णालयात हे रुग्ण आले. तेव्हा त्यांच्या पायाला सूज होती. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्यांचा सल्ला डाॅ.दहिभाते यांनी दिला. या रुग्णाचे एमआरआय केले. तेव्हा त्यांच्या शरीरातील बऱ्याचशा भागात पू  झाला होता. डोक्यापासून माकडहाड, पोट, पार्श्वभाग, किडनीजवळ, हातावरही पू होता. रक्तसंक्रमणही झाले होते. अशा परिस्थितीत रुग्णाच्या जीवाला जास्त धोका असतो.

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यातील चोरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात, पोलिसांकडून शोध सुरु

या सर्व गुंतागुंतीनंतर रुग्णाची प्रकृती खूप गंभीर असते. ताप व संसर्गाचे लक्षणे या रुग्णाच्या शरीरात अँन्टीबाॅडीज दिसून आल्या. या रुग्णाच्या घरात कुणालाच आधी कोविड झाला नाही. परंतु वैद्यकीय नोंदीनुसार रुग्णात अँटिबाॅडीज आढळल्यास रुग्णाला कोविड होऊन गेला असे मानले जाते. या दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. एवढ्या प्रमाणातील पू काढणे आवश्यक होता. म्हणून डाॅक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेवेळीही रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता धोका होताच. पण रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. 21  दिवस रुग्णाने उपचार घेतले. दोन दिवसांपूर्वीच रुग्ण चालत हसत घरी गेला.

जर्मनीत अशाच सहा केसेस

सध्या कोविडनंतरची शारीरिक गुंतागुंत काही रुग्णांत दिसून येत आहेत. त्यातील हा एक प्रकार होता. अशा रुग्णाबाबत डाॅ. दहिभाते व टिमने जगातील वैद्यकीय सामग्रीचा (लिटरेचर) शोध घेतला. त्यावेळी जर्मनीत मार्च ते मे दरम्यान अशा सहा केसेस लिटरेचरमध्ये नोंद होत्या. यातील चार कोविडबाधित व दोन लक्षणे नसलेल्या होत्या. त्यांना मणक्यात पू झालेला होता. ही जगातील सातवी केस असून तीस ते चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या डाॅक्टरांच्या मते त्यांनीही अशी केस बघितली नव्हती.

पोस्ट कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष नको

रुग्णाचा जीव वाचविणे सर्वांत मोठे आव्हान होते. मणक्यातील पू मुळे पायातील ताकद जाण्याची भीती होती. परंतु या दोन्हीवरही मात आम्ही केली. पोस्ट कोविडनंतर समस्या घेऊन रुग्ण आल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रत्येक वेळी लक्षणे दिसतीलच असे नाही.   

- डाॅ. श्रीकांत दहिभाते, स्पाईन सर्जन

संपादन - गणेश पिटेकर