खासदार जलील म्हणाले, धार्मिक स्थळे उघडा अन्यथा राज्यभर आंदोलन करु

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

खासदार इम्तीयाज जलील म्हणाले की, तुम्हाला काय नियम, अटी, शर्ती ठेवायच्या त्या ठेवा मात्र धार्मिक स्थळे उघडा. आंदोलन करण्यामागे सरकारका जागृत करणे ही आमची भूमिका आहे. काल पोलिसांच्या विनंती मान देऊन आंदोलन स्थगित केले होते.

औरंगाबादः तुम्हाला काय नियम, अटी, शर्ती ठेवायच्या त्या ठेवा मात्र धार्मिक स्थळे उघडा. आंदोलन करण्यामागे सरकारका जागृत करणे ही आमची भूमिका आहे. काल पोलिसांच्या विनंती मान देऊन आंदोलन स्थगित केले होते.

बुधवारी (ता.२) मशीदीत जाण्यासाठी निघाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आता शासनाने सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा तातडीने निर्णय घ्यावा. नसता आम्ही हे आंदोलन राज्यभर करु अशा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. 

हेही वाचा-BreakingNews: मशीद उघडण्याआधीच इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात

पोलिस आयुक्तालयात पोलिसांनी सुटका केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. खासदार जलील म्हणाले की, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. शहागंज येथे जातांना तुम्ही ताब्यात घेतले. मशिदीसमोर बंदोबस्त लावला. कुलुप लावले. आता उद्या, परवा आम्ही काय करणार ते कुणाला सांगणार नाही. आमचा मुद्दा काय आहे ते समजून घ्या. झोपलेल्या सरकारला आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. मी ठरवले असते तर हजारो लोकांना सोबत घेऊन गेलो असतो. मात्र २५ लोकांसोबत जात असतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

धार्मिक स्थळांसोबत लहान लहान दुकानदारांचे व्यवसाय आहेत. आज सहा महिने झाले त्यांचे कुटुंब कसे चालत असेल. नाहीतर सरकारने या लोकांसाठी पॅकेज जाहीर करावे. तुम्ही लग्नात पन्नास लोक जाऊ शकतात मात्र मशिदीत जाऊ शकत नाही. हा कुठला नियम आहे. राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे मशिदीत जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे पोलिसांनी यावेळी सांगितले अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

हे वाचलंत का?- मिनी मंत्रालयातील ऑनलाईन सभा म्हणजे 'आजार म्हशीला अन इंजेक्शन पखालीला

संपादनः गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Religious Places Otherwise To Be Agitation Across The State, Said Imtiaz Jaleel