esakal | वारे रे पठ्ठ्या ! नाट्यमंदिरे खुले करण्यासाठी बारा तास दिला 'ठिय्या'
sakal

बोलून बातमी शोधा

sandip lantgde natygruh.jpg
  • सांस्कृतिक क्षेत्र खुले करण्यासाठी तरुणाचा १२ तास ठिय्या 
  • ‘सेव्ह आर्टिस्ट, सेव्ह आर्ट’मुक आंदोलन 
  • कलाकारांचे व्यासपीठ खुले करा.

वारे रे पठ्ठ्या ! नाट्यमंदिरे खुले करण्यासाठी बारा तास दिला 'ठिय्या'

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, करमणूक क्षेत्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शहरातील स्थानिक कलाकारांना मोठा फटका बसत आहे. कलाकरांसाठी रंगमंदिरे सुरु करण्यास शासनाने परवानी द्यावी, यासाठी संगीत कलाकार अमर वानखेडे यांनी राज्य सरकारच्या विरोधात कॅनोट परीसरात सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हातात ‘सेव्ह आर्टिस्ट, सेव्ह आर्ट’ चा फलक धरुन आंदोलन केले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट, मंदिरे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. आता अनलॉकच्या विविध टप्प्यांवर शासनाद्वारे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र अजूनही कलाकारांच्या उपजिविकेचे साधन असलेल्या नाट्यगृह, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या संकटामुळे कलाकार, व्यावसायिकांवर आभाळ कोसळले आहे. मागील आठ महिन्यापासून ऑर्केस्ट्रा वादक, गायक, कलाकार, निवेदक या कलाकार आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कलाकारांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन कलाक्षेत्र सुरु करण्याची परवानी द्यावी.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासाठी अमर वानखेडे यांने जरा हटके पद्धतीने आंदोलन सुरु केले. शहरातील कॅनोट परीसरात सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हातात ‘आय एम् अन् आर्टिस्ट, अ पार्ट ऑफ युवर सेलिब्रेशन, डोण्ट लेट अस बेग’फलक घेवून आंदोलन केले. तसेच सोशल मिडियावर ‘सेव्ह आर्टीस्ट, सेव्ह आर्ट’या पद्धतीचे हॅशटॅग सुरु केले आहे. 
यावेळी त्याने सकाळशी बोलताना सांगीतले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका कलाक्षेत्राला बसला आहे. मागील आठ महिन्यांपासून कलाकार बेरोजगार झाले आहेत. सर्व उद्योग पुर्वपदावर येण्यासाठी शासनाकडून ऑनलॉकचे टप्पे सुरु केले. मात्र, अजूनही मनोरंजन क्षेत्राला परवानी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारने कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी द्यावी. आम्हाला सरकारकडून अनुदान नको, फक्त कला सादर करण्याची परवानी द्यावी. 

(संपादन-प्रताप अवचार)