पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसमोर पालकांची निदर्शने, अवाजवी शुल्क वसुलीचा आरोप

संदीप लांडगे
Tuesday, 3 November 2020

ऑनलाईन शिक्षणासाठी शाळांकडून अवाजवी शुल्क वसूल करण्यात येत आहे, असा आरोप पालकांकडून वारंवार होतो. या शुल्क वसुली विरोधात मंगळवारी (ता.तीन) शहानुरमियॉँ परिसरातील पोद्दार स्कूलसमोर पालकांनी निदर्शने केली.

औरंगाबाद : ऑनलाईन शिक्षणासाठी शाळांकडून अवाजवी शुल्क वसूल करण्यात येत आहे, असा आरोप पालकांकडून वारंवार होतो. या शुल्क वसुली विरोधात मंगळवारी (ता.तीन) शहानुरमियॉँ परिसरातील पोद्दार स्कूलसमोर पालकांनी निदर्शने केली. पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबद्दल शाळेला अनेक वेळा शांततेच्या मार्गाने विनंती अर्ज केले होते. परंतु, शाळा कुठल्याही प्रकारचे सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन पालकांना सहकार्य करत नाही. उलट पालक अथवा पाल्यांना सतत फोनवर मॅसेजच्या माध्यमातून मानसिक त्रास देत आहेत. यावेळी शाळा प्रशासनासह जवाहरनगर पोलिसांना पालकांनी निवेदन दिले. निवेदनावर दिव्या पाटील, रमेश कापरे, रणकर पंड्या, सुप्रिया देशपांडे, निलेश पटले यांची नावे आहेत. या संदर्भात प्रा. रविंदर राणा यांना विचारले असता, त्यांनी पालकांनी दिलेल्या लेखी निवेदनाला आम्ही देखील लेखी स्वरुपातच उत्तर देऊ, असे सांगितले.

जैन इंटरनॅशन, युनिर्व्हसल स्कूलची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला पाठविण्यात

शाळेसमोर पालकांची आंदोलने वाढली
यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे अनेक शाळा ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे शाळा विविध शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत. कोरोनामुळे सर्वच पालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. या काळात शाळांकडून शुल्कवसूलीबाबत सुरु असलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध पालकांचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत दहा ते पंधरा शाळांविरोधात पालकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची संख्या वाढतच चाललेली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents Demonstrate Before Poddar International Aurangabad News