खुलताबादमध्येही असा निघाला पहा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

देशभर गाजत असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व नागरिकत्व नोंदणी सूचीला विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी (ता. 27) खुलताबाद शहरासह तालुक्‍यातील नागरिकांनी मोर्चा काढला.

खुलताबाद (जि.औरंगाबाद ) ः देशभर गाजत असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व नागरिकत्व नोंदणी सूचीला विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी (ता. 27) खुलताबाद शहरासह तालुक्‍यातील नागरिकांनी मोर्चा काढला. या मोर्चाची सुरवात शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नगारखाना दरवाजापासून झाली.

या मोर्चात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. मोदी-शहांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी युवकवर्गाने विविध फलक आणले होते. शहरातील नगारखाना प्रवेशद्वारापासून सुरू झालेला हा मोर्चा शांतपणे अन्‌ तेवढ्याच आक्रमक घोषणा देत सब्जीमंडी, जुने बसस्थानकमार्गे मीर हाफिज खलील चौकातील मशिदीसमोर सभेत रूपांतरित झाला. तत्पूर्वी याच चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नागरिकांनी अभिवादन केले.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

या सभेच्या ठिकाणी तहसीलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक चंदन इमले यांना निवेदन देण्यात देण्यात आले. यावेळी तालुक्‍यातील मशिदींमधील धर्मगुरू, नगराध्यक्ष एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष ऍड. कैसरोद्दीन, हाजी अकबर बेग, नगरसेवक मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, शेरफोद्दीन रमजानी, मुजीबोद्दीन हाफिजोद्दीन, मोहम्मद नईम बक्ष, मकसूद कादरी, फकीर कुरैशी यांच्यासह शहर, तालुक्‍यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

या मोर्चा मार्गावर पोलिस निरीक्षक चंदन इमले, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात सहभागी नागरिकांना यावेळी पाणी व केळीचे वाटप करण्यात आले. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर राष्ट्रगीताने सभेस सुरवात झाली. सभेत बालवक्‍त्यांनी जोरदार भाषणे केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेतेमंडळी, विविध मशिदींतील धर्मगुरूंनी नागरिकत्व सुधारणा कायदा व नागरिकत्व नोंदणी सूची रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People March Against Citizenship Amendment Act Khultabad