शिवरायांचे 200 किल्ले 2 महिन्यात सर करणारा बेल्जियमचा मावळा

सुशेन जाधव
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मूळचा बेल्जियमचा नागरिक असलेल्या पीटर व्हॅन गेट कामानिमित्त काही वर्षांपासून चेन्नईत राहतो. त्याला भटकंतीची प्रचंड आवड आहे. दर उन्हाळ्यात हिमालयात ट्रेकिंगला जाणाऱ्या पीटरचं सह्याद्रीच्या रांगांवर प्रेम जडलं आणि त्यानं...

औरंगाबाद : दोन महिन्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे दोनशे किल्ले सर करणारा बेल्जियमचा मावळा पीटर व्हॅन गेट औरंगाबाद शहरात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्याचं व्याख्यान झालं आणि वकील मंडळींनी त्याचा सत्कारही केला.

खंडपीठातील वकील कक्षात झालेल्या कार्यक्रमात पीटर व्हॅन गेट यांनी आपल्या मोहिमांची माहितीही वकिलांना दिली. जगातील सर्व सर्वोच्च शिखरे त्याने पादाक्रांत केलेली आहेत. त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी मोठे आकर्षण आहे. 

औरंगाबादचे संभाजीनगर करा, वाचा कोणी केला शिवसेनेचा मुद्दा हायजॅक

मूळचा बेल्जियमचा नागरिक असलेल्या पीटर व्हॅन गेट कामानिमित्त काही वर्षांपासून चेन्नईत राहतो. त्याला भटकंतीची प्रचंड आवड आहे. दर उन्हाळ्यात हिमालयात ट्रेकिंगला जाणाऱ्या पीटरचं सह्याद्रीच्या रांगांवर प्रेम जडलं आणि त्यानं गेल्या हिवाळ्यात सह्याद्रीची सैर सुरू केली. दोन महिन्यांतच त्यानं तब्बल २०० किल्ले सर केले. एवढंच नाही, तर या सर्व किल्ल्यांचा इतिहासही समजावून घेतला. 

जमेल तिथे नक्कीच फिरलं पाहिजे

औरंगाबाद खंडपीठात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात त्याने शिवरायांच्या गडकिल्ल्यांबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं. शिवकालीन महाराष्ट्र आणि प्रत्येक किल्ल्याबद्दल इत्थंभूत माहिती असलेल्या या अवलियाने वकीलांना पुष्कळच माहिती दिली.

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

महाराष्ट्रात राहून, इथल्या मातीतले असून या महाराष्ट्राच्या दौलतीचे आपले असलेले तोकडे ज्ञान हा आत्मचिंतनाचा विषय आहे. त्यामुळे जमेल तेंव्हा जमेल तिथे नक्कीच फिरलं पाहिजे आणि शक्‍य तेवढे गड किल्ले नक्कीच बघितले पाहिजेत, असा सल्ला पीटर व्हॅन गेट याने शेवटी दिला.

याप्रसंगी ऍड. संभाजी टोपे, ऍड. रामचंद्र निर्मळ व ऍड. अनुप निकम, ऍड. अमोल चाळक पाटील यांनी त्याचा भगवी शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रमास खंडपीठातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉक्टर म्हणतात, चिकन खाल्याने कोरोना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peter Van Geit Of Belgium In Aurangabad Maharashtra Fort News